Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग 'या' पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार
Skin Care Tips: कामाच्या धावपळीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. वाढते ऊन, प्रदुषण, धूर, धूळ, प्रदूषणामुळे त्वचा निस्तेज होते आणि त्वचेच्या समस्या वाढू लागतात. तरुण वयातच त्वचेसबधिंत समस्या वाढू लागल्यानंतर चेहऱ्यावरील ग्लो कमी होतो. त्वचेवर पिगमेंटेशन, टॅनिंग आणि डेडस्किन वाढते. याशिवाय तरुण वयातच सैल पडते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी महागडे फेशियल तर कधी स्किन ट्रीटमेंट करुन त्वचेची काळजी घेतली जाते. पण फेशियलचा ग्लो फारकाळ चेहऱ्यावर टिकून राहत नाही. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी लसूणाचा वापर त्वसेसाठी करावा. चला तर जाणून घेऊया लसूण वापरण्याची योग्य पद्धत.(फोटो सौजन्य – istock)
पिगमेंटेशन, टॅनिंग घालवण्यासाठी लसणाच्या १० ते १२ पाकळ्या घेऊन किसणीच्या मदतीनेे बारीक किसून घ्या. टोपात दूध गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात बारीक केलेला लसूण घालून मंद आचेवर गॅस ठेवा आणि गरम करुन घ्या. दूध आटून अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करा. थंड झालेले दूध गाळून घ्या आणि त्यात ॲलोव्हेरा जेल, ग्लिसरीन घालून सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण एका काचेच्या बरणीमध्ये भरुन ठेवा. मिश्रण तुम्ही ८ ते १० दिवस वापरु शकता.
तयार केलेली क्रीम लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा आणि कोरडा करून घ्या. त्यानंतर हातांवर क्रीम घेऊन चेहऱ्यावर लावा आणि ५ ते ७ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर त्वचा धुण्याची अजिबात आवश्कता नाही. नियमित चेहऱ्यावर तयार केलेली क्रीम लावल्यास त्वचा आतून सुंदर होण्यास मदत होईल. पण कोणतेही क्रीम त्वचेला लावण्याआधी पॅचटेस्ट नक्कीच करुन पाहावी.
लसणामध्ये ॲझालिक ॲसिड असते. ज्यामुळे पिगमेंटेशन, टॅनिंग कमी होण्यासोबच त्वचा मऊ आणि सुंदर होते. त्वचा अधिक तरुण दिसण्यासाठी कायमच महागड्या स्किन केअरचा वापर करु नये. स्वंयपाक घरात उपल्बध असलेल्या पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा. पिगमेंटेशनचे डाग कमी करण्यासाठी महिला वांरवांर फेशियल, क्लीनअप करतात. सतत केमिकल प्रोडक्ट्सचा वापर केल्यामुळे त्वचा कोरडी पडून जाते. त्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी घरगुती उपाय करावेत.
Ans: लसूणमध्ये काही जैवसक्रिय घटक असले तरी कच्चा लसूण थेट त्वचेवर लावल्याने जळजळ, लालसरपणा किंवा त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे घरगुती उपाय म्हणून थेट लसूण चेहऱ्यावर लावणे टाळणे सुरक्षित आहे.
Ans: पिगमेंटेशन कमी करण्यासाठी थेट लसूण लावल्याचे पुरेसे वैज्ञानिक पुरावे नाहीत. उलट संवेदनशील त्वचेवर लसूण त्रासदायक ठरू शकतो.
Ans: कच्चा लसूण थेट चेहऱ्यावर न लावणे चांगले. कोणतेही नवीन त्वचा उत्पादन वापरण्यापूर्वी छोट्या भागावर पॅच टेस्ट करावी.






