Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hands Feet Itch: हातापायांच्या तळव्यांना कायमच खाज येते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि घरगुती उपाय

hands and feet itch: थंडीच्या दिवसांमध्ये हातापायांच्या तळव्यांवर खूप जास्त खाज येते. त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी झाल्यानंतर आणि त्वचेसंबंधित इन्फेक्शन वाढल्यानंतर पायांच्या तळव्यांना खूप जास्त खाज येते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2026 | 08:02 AM
hands and feet itch: हातापायांच्या तळव्यांना कायमच खाज येते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि घरगुती उपाय

hands and feet itch: हातापायांच्या तळव्यांना कायमच खाज येते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

Hands Feet Itch: बऱ्याचदा कोणत्याही कारणाशिवाय झोपल्यानंतर किंवा इतर वेळी हातापायांच्या तळव्यांना खूप जास्त खाज सुटते. ही खाज काहीवेळा लगेच कमी होते तर काहीवेळा तासनतास तळव्यांना खाज येते. थंडीच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने लालसरपणा, लहान पुरळ किंवा त्वचा सोलवटल्यासारखी दिसू लागते. वातावरणात होणारे बदल थेट शरीरावर दिसू लागतात. तसेच दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम सुद्धा आरोग्यावर दिसू लागतो. पण वारंवार येणाऱ्या खाजेकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया थंडीच्या दिवसांमध्ये हातापायांना सतत खाज का येते आणि त्यावर कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

जेवणानंतर वाढणाऱ्या ग्लुकोजची चिंता मिटणार? ModiCare ने लॉन्च केले ‘ShiftLife Anti-Spike Daily’, ब्रिटिश पोषण विज्ञान आता भारतात

हातापायांना खाज येण्याची कारणे:

त्वचेवर वाढलेला कोरडेपणा:

हात आणि पायांच्या तळव्यांची त्वचा कोरडी पडल्यानंतर खाज सुटण्याची जास्त शक्यता असते. वारंवार साबणाने हात धुणे, गरम पाण्याचा वापर करणे किंवा वारंवार केमिकल युक्त स्किन केअरचा वापर करणे इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचा खूप जास्त कोरडी पडून जाते. त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कमी झाल्यानंतर त्वचा ताणल्यासारखी होते आणि त्वचेला खाज येते.

ॲलर्जी किंवा रिॲक्शन:

नवीन साबण, हँडवॉश, डिटर्जंट, सॅनिटायझर, पायांना लावलेली क्रीम किंवा चपलांमुळे ॲलर्जी होण्याची शक्यता असते. याला कॉन्टॅक्ट डर्मटायटिस असतात. तळव्यांना खाज येण्यासोबत लालसरपणा, सूज किंवा लहान पुरळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे हातापायांना वारंवार खाज येत असेल व्हॅसलिन किंवा खोबरेल तेलाचा वापर करावा.

बुरशीजन्य संसर्ग:

बऱ्याचदा पायांच्या बोटांमधील जागा सतत ओलसर राहिल्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे बोटांमधील स्किन कोरडी पडते आणि त्वचेची साल जाऊ लागतात. पायांच्या तळव्यांना खाज, त्वचा सोलवटणे, भेगा पडणे किंवा जळजळ होऊन त्वचा ताणल्यासारखी वाटते. त्यामुळे कोणत्याही चपलांचा वापर करताना त्या पायाला सूट होतील का याची काळजी घ्यावी.

Homemade Soap: जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार

एक्झिमा:

हाताच्या किंवा पायाच्या तळव्यांवर एक्झिमाचा होण्यास सुरुवात झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. लहान पाण्याने भरलेले फोड येणे, तीव्र खाज सुटणे आणि त्वचा कोरडी पडणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. डिशिड्रोटिक एक्झिमामध्ये तळव्यांवर लहान फोड येतात, ज्याच्या परिणामामुळे पायांना खूप जास्त खाज सुटण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हातापायांच्या तळव्यांना सतत खाज येण्याची कारणे कोणती?

    Ans: हातापायांच्या तळव्यांना खाज येण्यामागे त्वचेचा कोरडेपणा, अ‍ॅलर्जी, एक्झिमा, फंगल इन्फेक्शन, साबण किंवा केमिकल्सची प्रतिक्रिया अशी विविध कारणे असू शकतात.

  • Que: हाताच्या तळव्यांना खाज येण्यामागे कोणत्या समस्या असू शकतात?

    Ans: हाताच्या तळव्यांना सतत खाज येत असल्यास कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस, एक्झिमा किंवा त्वचेची अ‍ॅलर्जी कारणीभूत असू शकते. काही वेळा यकृताशी संबंधित समस्यांमुळेही खाज येऊ शकते.

  • Que: पायांच्या तळव्यांना खाज येण्याची कारणे कोणती?

    Ans: पायांच्या तळव्यांना खाज येण्यामागे त्वचेचा कोरडेपणा, बुरशीजन्य संसर्ग, घामामुळे होणारी जळजळ किंवा अ‍ॅलर्जी ही कारणे असू शकतात.

Web Title: Hands feet itch why do your palms and soles keep itching know the causes and home remedies sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • skin care tips
  • Winter Care

संबंधित बातम्या

Amla Ladoo Recipe: थंडीत कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित खा आवळ्याचा पौष्टिक लाडू, त्वचा केसांना मिळेल पोषण
1

Amla Ladoo Recipe: थंडीत कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित खा आवळ्याचा पौष्टिक लाडू, त्वचा केसांना मिळेल पोषण

Male Fertility Tips: फॉलिक ॲसिड केवळ महिलांसाठीच नाही; तर पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठीही आवश्यक, जाणून घ्या सविस्तर
2

Male Fertility Tips: फॉलिक ॲसिड केवळ महिलांसाठीच नाही; तर पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठीही आवश्यक, जाणून घ्या सविस्तर

Cinnamon Tea: थंडीत आवर्जून प्यायला हवा गरमागरम दालचिनीचा चहा, हृदयाचे आरोग्य राहील निरोगी
3

Cinnamon Tea: थंडीत आवर्जून प्यायला हवा गरमागरम दालचिनीचा चहा, हृदयाचे आरोग्य राहील निरोगी

Homemade Soap: जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार
4

Homemade Soap: जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.