
World Book Fair 2026
यंदाची खास थीम
2026 च्या पुस्तक मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना अत्यंत अर्थपूर्ण आहे. “Indian Military History: Valour and Wisdom @ 75” ही यंदाची थीम भारतीय सशस्त्र दलांना समर्पित आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने देशासाठी दिलेल्या योगदानाचे दर्शन या थीममधून घडते. या अनुषंगाने एक स्वतंत्र पवेलियन उभारण्यात आले आहे. येथे पुस्तके, छायाचित्रे, माहितीपट आणि लाईव्ह सादरीकरणांच्या माध्यमातून भारतीय सैन्याचा इतिहास उलगडून दाखवला जाईल. लष्करी इतिहास व रणनीतीवर आधारित 500 हून अधिक पुस्तके येथे उपलब्ध असून, त्यापैकी अनेक पुस्तके स्वतः सैनिक व अनुभवी तज्ज्ञांनी लिहिलेली आहेत.
कतार ‘गेस्ट ऑफ ऑनर’, स्पेन ‘फोकस कंट्री’
हा मेळा जरी दिल्लीमध्ये होत असला, तरी येथे जगभरातील साहित्यिक संस्कृतीचा अनुभव घेता येईल. यंदा कतार देशाला *‘गेस्ट ऑफ ऑनर’*चा मान देण्यात आला आहे, ज्यासाठी विशेष विभाग राखीव असेल. तसेच स्पेन हा ‘फोकस कंट्री’ असल्याने स्पॅनिश लेखक, साहित्य आणि कथा यांची खास झलक पाहायला मिळेल. याशिवाय रशिया, जपान, यूएई यांसारखे अनेक देशही आपल्या स्टॉल्ससह सहभागी होत आहेत.
मुलांसाठी खास ‘चिल्ड्रन्स पवेलियन’
कुटुंबासह मेळ्याला येत असाल, तर हॉल क्रमांक 6 नक्की भेट द्या. येथे उभारलेला ‘चिल्ड्रन्स पवेलियन’ (किड्ज एक्सप्रेस) मुलांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. येथे केवळ पुस्तकेच नाहीत, तर शिकत-खेळत अनुभव देणारे अनेक उपक्रम आहेत:
गोष्ट सांगण्याचे (स्टोरी टेलिंग) सत्र
कार्टून डिझाइन आणि कॅलिग्राफी वर्कशॉप्स
क्रिएटिव्ह कॉर्नर्स आणि संवाद सत्रे
परदेशी लेखकांशी थेट भेटीगाठी
संध्याकाळी संगीत आणि कविता
सूर्यास्तानंतरही मेळ्याची चैतन्यपूर्ण वातावरण कायम राहणार आहे. दररोज संध्याकाळी लाईव्ह म्युझिक, लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. यंदाच्या लष्करी थीमनुसार आर्मी आणि नेव्ही बँड्सची खास मैफल रंगणार आहे. प्रसिद्ध संगीतकार रिकी केज तसेच पारंपरिक लोकगायकांच्या सादरीकरणांचा आनंदही घेता येईल. काव्यप्रेमींसाठी *‘पोएट्री नाइट्स’*चे आयोजन असून, देश-विदेशातील कवी आपल्या रचना सादर करतील.
डिजिटल वाचकांसाठी ई-बुक्सची मेजवानी
डिजिटल वाचनाची आवड लक्षात घेऊन मेळ्यात ‘राष्ट्रीय ई-पुस्तकालय’ उपक्रम राबवण्यात येत आहे. येथे उभारलेल्या डिजिटल कियोस्कवर 6,000 पेक्षा अधिक मोफत ई-बुक्स वाचता येतील. तसेच एआय, गेमिंग आणि नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कथा सांगण्याच्या आधुनिक पद्धतींवर चर्चा व सादरीकरणेही पाहायला मिळतील.
Winter Trekking Spots : कमी गर्दी, जास्त निसर्ग; हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणे
प्रवेश, वेळ आणि प्रवासाची माहिती
या मेळ्याची सर्वात आनंदाची बाब म्हणजे प्रवेश पूर्णपणे मोफत आहे.