
निपाह व्हायरसचा प्रकोप
भारताचे दक्षिणेकडील राज्य केरळ पुन्हा एकदा निपाह व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे, रविवारी, 21 जुलै रोजी मल्लपुरम जिल्ह्यात एका 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे. मृतक हे पंडिक्कड शहरातील रहिवासी होते, सकाळी 10:50 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, “तो मुलगा बेशुद्ध झाला होते आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला वाचवण्याचे बरेच प्रयत्न करण्यात आले, परंतु सर्व उपाय अयशस्वी झाले आणि त्यानंतर सकाळी 11.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.” आरोग्य मंत्री पुढे म्हणाले, मांजेरी मेडिकल कॉलेजमध्ये 40 जण दाखल असून त्यापैकी एक व्यक्ती ICU मध्ये आहे. (फोटो सौजन्य – iStock)
तपास टीम पाठविण्यात येणार
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात निपाह विषाणू संसर्गाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, केंद्र सरकार राज्य सरकारला तपासाच्या कामात मदत करण्यासाठी ‘मल्टी-मेंबर जॉईंट आऊटब्रेक रिस्पॉन्स टीम’ तैनात करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हायरसचे साथीच्या आजाराशी काय संबंध आहे हे ओळखण्यासोबतच केंद्रीय पथक तांत्रिक मदतही यावेळी करणार आहे. मागच्यावर्षी 2023 मध्ये या विषाणूचा उद्रेक कोझिकोड जिल्ह्यात झाल्याचे आढळले होते.
हेदेखील वाचा – सावधान! ‘हा’ व्हायरस लहान मुलांसाठी ठरतोय जीवघेणा, जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
निपाह व्हायरसचा इतिहास
निपाह व्हायरसचा उगम कुठे झाला
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, मलेशियातील डुक्कर उत्पादकांमध्ये महामारीच्या वेळी 1999 मध्ये निपाह विषाणूची प्रथम ओळख झाली होती. त्यानंतर मलेशियामध्ये कोणताही नवीन उद्रेक झालेला नाही. बांगलादेशमध्ये 2001 मध्ये साथीच्या रोगांची नोंद झाली होती आणि तेव्हापासून त्या देशात जवळजवळ दरवर्षी निपाहचा उद्रेक होत आहेत.
पूर्व भारतातही हा आजार वेळोवेळी आढळून आला आहे. कंबोडिया, घाना, इंडोनेशिया, मादागास्कर, फिलिपिन्स आणि थायलंडसह अनेक देशांमध्ये विषाणूचे वाहक (पटेरूपस वटवाघूळ प्रजाती) आणि इतर अनेक वटवाघळांच्या प्रजाती आढळून आल्याने इतर अनेक क्षेत्रांना देखील संसर्गाचा धोका असू शकतो असे अभ्यासात सांगण्यात आले आहे.
Nipah चे लक्षण
WHO च्या मते, निपाह विषाणूमुळे माणसांमध्ये सौम्य संसर्ग ते तीव्र श्वसन संक्रमण होऊ शकते, बऱ्याच प्रकरणांमध्ये एन्सेफलायटीस घातक पातळीपर्यंत पोहोचू शकतो.