
तुम्हालाही Breast cancer तर नाही? कपडे घालताना ही गोष्ट नक्की तपासा, वेळीच टाळता येईल गंभीर समस्या
स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा स्तनांमधील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा आजार आहे, जो योग्य वेळी निदान झाल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. याची लक्षणे फार सामान्य असून निरीक्षणातून त्याला वेळीच ओळखता येऊ शकते. स्तनांच्या आत्म-जागरूकतेचा उद्देश कुणाच्याही मनात भीती निर्माण करणे नाही तर आजाराला वेळीच रोखणे आहे. यासाठी कोणत्या तपासणीची गरज नाही तर हा रोजच्या जीवनाचा एक भाग आहे. उदाहरणार्थ, कपडे बदलताना आरशात स्तनाच्या आकारात फरक दिसणे, ब्रा घालताना गाठ जाणवणे किंवा आंघोळ करताना किंवा झोपताना एखाद्या विशिष्ट भागात सतत वेदना जाणवू लागते. तुम्हालाही असे बदल आपल्या शरीरात जाणवत असतील तर वेळीच यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे
अशी कोणतीही लक्षणे शरीरात जाणवू लागली तर लगेच रुग्णालय गाठा. प्रत्येक गाठ कर्करोगाचीच असते असे नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये, ती हार्मोनल बदल, सिस्ट किंवा सामान्य समस्येचा परिणाम असू शकते. तथापि कोणतेही बदल जाणवले तर त्यावर वेळीच चाचणी करणे महत्त्वाचे ठरते. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, कोणतेही बदल जाणवताच त्यावर वैद्यकीय तपासणीची गरज असते. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी मॅमोग्राम या पद्धतीचा वापर केला जातो. साधारणपणे, ४० किंवा ४५ वर्षांनंतरच्या महिलांना वर्षातून एकदा किंवा दर दोन वर्षांनी मॅमोग्राम करण्याचा सल्ला दिला जातो. फॅमिली हिस्ट्री, जेनेटिक रिस्क फॅक्टर किंवा दाट स्तन असलेल्या महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीची पद्धत त्याच्या प्रकारानुसार वेगवेगळी असू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.