Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

औषधांशिवाय शांत झोप! हे 4 नैसर्गिक पदार्थ ठरू शकतात स्लीपिंग पिल

झोप न येण्याच्या समस्येवर औषधांऐवजी नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित ठरू शकतात. केळी, कोमट दूध, भोपळ्याच्या बिया आणि कॅमोमाइल चहा हे 4 पदार्थ झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 08, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • शांत झोपेसाठी बाजारातील गोळ्याच नाही तर काही नैसर्गी पर्याय देखील प्रभावी ठरतात.
  • काही घरगुती पदार्थांचे सेवन करून शांत झोप घेत येते.
  • चला ही कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊया.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना नीट झोप येत नाही. रात्री उशिरापर्यंत डोळे लागणार नाहीत, सतत कुशी बदलावी लागते किंवा सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो—ही लक्षणे झोपेच्या समस्येचीच आहेत. ही समस्या दीर्घकाळ दुर्लक्षित केली, तर शरीराची नैसर्गिक लय (बॉडी क्लॉक) बिघडू शकते. त्यामुळे औषधांचा आधार घेण्याआधी काही सोपे, नैसर्गिक उपाय करून पाहणे महत्त्वाचे ठरते. योग्य आहारातील 4 पदार्थ नैसर्गिकरीत्या चांगली झोप लागण्यास मदत करू शकतात.

काही चटपटीत खायचंय? मग घरी बनवा अमृतसरी ‘स्टफ्ड छोले कुलचे’, चटपटीत चव पंजाबचा फील आणेल

झोप न येण्याची समस्या का गंभीर आहे?

झोप ही शरीरासाठी अत्यावश्यक प्रक्रिया आहे. याच काळात शरीरातील पेशी स्वतःची दुरुस्ती करतात, नवीन पेशी तयार होतात, जखमा भरून निघतात आणि शारीरिक वाढ घडते. मेंदूही याच वेळेत रिलॅक्स होऊन नवीन माहिती आणि आठवणी साठवतो. पण पुरेशी झोप न मिळाल्यास हे सर्व प्रक्रियेवर परिणाम होतो, ज्यामुळे थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव आणि आरोग्य समस्या वाढू शकतात.

झोपेच्या गोळ्यांऐवजी नैसर्गिक पर्याय

झोप न येण्याने त्रस्त अनेक लोक थेट स्लीपिंग पिल्स घेतात. मात्र अशा गोळ्यांची सवय लागू शकते. तज्ज्ञांच्या मते, औषधांचा मार्ग स्वीकारण्याआधी जीवनशैलीत आणि आहारात बदल करून झोपेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करावा. रात्री योग्य वेळी योग्य पदार्थ खाल्ल्यास झोप नैसर्गिकरीत्या सुधारू शकते.

1 ते 2 आठवड्यांत फरक जाणवू शकतो

न्यूट्रिशन तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल, तर खालील 4 पदार्थ नियमितपणे आहारात समाविष्ट करा. यासोबतच उशिरा कॅफिन घेणे टाळा आणि जड जेवण करू नका. हे नियम 1–2 आठवडे पाळल्यास झोपेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारू शकते.

झोपण्याआधी 30–40 मिनिटे: केळी

केळी हा झोपेसाठी उत्तम नॅचरल स्नॅक आहे. त्यामध्ये मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन हे घटक असतात, जे स्नायूंना आराम देतात. ट्रिप्टोफॅनपासून मेलाटोनिन हार्मोन तयार होते, जे झोपेचा सायकल नियंत्रित करते. झोपण्याच्या अर्धा तास आधी एक लहान केळी खाल्ल्यास चांगली मदत होते.

झोपण्यापूर्वी कोमट दूध

ज्यांचे पचन दूध सहज सहन करते, त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय आहे. दुधात ट्रिप्टोफॅन आणि कॅल्शियम असते, जे मेलाटोनिनच्या निर्मितीस सहाय्य करते. शिवाय, कोमट दूध मानसिक आरामही देते, ज्यामुळे झोप लवकर लागते. त्यात चिमूटभर हळद किंवा जायफळ घातल्यास सूज आणि चिंता कमी होण्यास मदत होते.

संध्याकाळी भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. हे घटक मेलाटोनिनचे उत्पादन संतुलित ठेवतात. संशोधनानुसार झिंकची कमतरता झोपेवर वाईट परिणाम करू शकते. संध्याकाळी 1–2 चमचे भाजलेल्या भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास फायदा होतो.

झोपण्याआधी 20 मिनिटे: कॅमोमाइल चहा

कॅमोमाइल चहा रात्रीची सवय बनवू शकता. या चहामध्ये ‘एपिजेनिन’ नावाचे संयुग असते, जे मेंदूतील गाबा रिसेप्टर्स शांत ठेवते. काही क्लिनिकल अभ्यासांमध्ये कॅमोमाइल चहामुळे झोपेची गुणवत्ता सुधारल्याचे आढळले आहे. झोपण्याच्या सुमारे 20 मिनिटे आधी कोमट कॅमोमाइल चहा हळूहळू प्या.

सकाळी उठताच गटागट हिरव्या पानांच्या या ड्रिंकचे सेवन करा, त्वचेपासून कोड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, डॉक्टरांचा स्वस्त उपाय

झोपेची समस्या दूर करण्यासाठी लगेच औषधांवर अवलंबून न राहता आहार आणि सवयींमध्ये छोटे बदल करून पाहा. हे 4 नैसर्गिक पदार्थ नियमित घेतल्यास, सवय न लागता शांत आणि दर्जेदार झोप मिळण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

Web Title: No need of medication these 4 natural ingredients can act as sleeping pills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • food history

संबंधित बातम्या

जगातील सगळ्यात पहिले Ice cream कोणी आणि कोणत्या देशात बनवण्यात आले? जाणून घ्या थंडगार आईस्क्रीमचा इतिहास
1

जगातील सगळ्यात पहिले Ice cream कोणी आणि कोणत्या देशात बनवण्यात आले? जाणून घ्या थंडगार आईस्क्रीमचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.