Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

No Gas, No Oil Food : तुम्हाला माहिती आहे का? गॅस आणि तेलाच्या एका थेंबाचाही वापर न करता तुम्ही टेस्टी आणि हेल्दी स्नॅक्सचे पर्याय घरीच तयार करु शकता. चला पदार्थांची रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 29, 2026 | 08:15 PM
विना गॅस आणि विना तेल तयार करा 'हे' झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

विना गॅस आणि विना तेल तयार करा 'हे' झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • गॅस-तेलाशिवाय झटपट तयार करा टेस्टी दही ब्रेड चाट
  • काकडी आणि पनीरपासून बनवा हेल्दी आणि चविष्ट बाईट्स
  • सँडविच लव्हर्ससाठी ट्राय करा नो-ऑईल कोल्ड सँडविच
वाढता लठ्ठपणा पाहता आजकाल अनेकजण नो ऑईल कुकिंगकडे वळू लागले आहेत. याचाच अर्थ टेस्टी जेवण बनवणे पण तेलाशिवाय… आता तुम्हाला वाटेल की, तेलाशिवाय पदार्थ कसे बरे तयार करता येतील. तर तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की, काही पदार्थ हे असे असतात ज्यांना तेलाच्या आणि गॅसच्या वापराशिवाय तयार केले जाऊ शकते. यामुळे तुमचा गॅसही वाचेल आणि तेलाचा वापर नसल्याने पदार्थ आरोग्यासाठी हेल्दी देखील ठरेल. आज या लेखात आपण असेच काही भन्नाट स्नॅक्सचे पदार्थ पाहणार आहोत जे गॅस आणि तेलाच्या वापराशिवाय तयार केले जातात. आपल्या रोजच्या डाएट रुटीनमध्ये तुम्ही या पदार्थाचा समावेश करु शकता. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

दही ब्रेड चाट

संध्याकाळच्या हलक्या भूकेला शमवण्यासाठी तुम्ही दही ब्रेड चाट ही टेस्टी पदार्थ तयार करु शकता. यासाठी ब्रेडला लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. आता एका बाऊलमध्ये घट्टसर दही, मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चाट मसाला मिसळून सर्व साहित्य एकत्र करा. आता ब्रेडच्या तुकड्यांवर हे तयार मिश्रण पसरवा. मग यावर चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी कोथिंबीर घाला. यानंतर आपल्या टेस्टनुसार यावर हिरवी चटणी, गोड चटणी आणि बारीक शेव घालून पदार्थाला छान सजवा. तुमची दही ब्रेड चाट खाण्यासाठी तयार आहे.

काकडी-पनीर बाईट्स

काकडी आणि पनीर दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे पदार्थ ठरत असतात. यापासून तुम्ही एक टेस्टी आणि हेल्दी असा स्नॅक्सचा पदार्थ तयार करु शकता. यासाठी प्रथम काकडीचे गोल तुकडे करा आणि मग पनीरचे क्यूबमध्ये तुकडे करा. आता काकडीच्या गोल कापांवर हे पनीरचे क्यूब्स ठेवा. यावर काळे मीठ, भाजलेले जिरे आणि चाट मसाला शिंपडा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावर हिरवी चटणी देखील घालू शकता. हलक्या नाश्त्यासाठी हा पदार्थ चांगला पर्याय ठरेल.

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

कोल्ड सँडविच

सँडविच लव्हर्ससाठी खास तुम्ही तेल आणि गॅसशिवाय व्हेज कोल्ड सँडविच तयार करु शकता. यासाठी प्रथम एका बाऊलमध्ये काकडी, टोमॅटो, कांदा आणि गाजराला बारीक चिरुन एकत्र करा. मग यात मेयॉनीज, काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ घाला. एका ब्रेडच्या स्लाईसवर हे मिश्रण समान पसरवा आणि दुसरा ब्रेड स्लाईस यावर ठेवून हलका दाब द्या. चाकूने सँडविचचे दोन तुकडे करा आणि कोल्ड सँडविच खाण्यासाठी सर्व्ह करा.

 

Web Title: No oil no gas snacks recipes dahi bread chaat cucumber paneer bites cold sandwich

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • food recipe
  • healthy recipe
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका
1

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
2

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.