नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
Food Recipe: रोजच्या आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश केला जातो. याशिवाय भूक लागल्यानंतर सॅलड किंवा चाट बनवून खाल्ले जाते. कधी कढधान्यचे चाट बनवून खाल्ले जाते तर वेगवेगळ्या कच्च्या भाज्यांचे सॅलड बनवून खाल्ले जाते. पण त्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड बनवून खावे. हे सॅलड घरातील लहान मुलांना खूप जास्त आवडेल. मुलं बाहेर गेल्यानंतर कायमच चिप्स किंवा कुरकुरे खाण्यास मागतात. त्यामुळे चिप्ससोबतच मुलांना वेगवेगळ्या भाज्या सुद्धा खाण्यास द्याव्यात. यामुळे चवीसोबतच शरीराला सुद्धा फायदे होतात. घरात पार्टी ठेवल्यानंतर स्नॅक्स म्हणून कोणता पदार्थ ठेवावा, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






