Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या जेवणाला बनवा शाही मेजवानी! तीच तीच बिर्याणी नाही; यावेळी ट्राय करा चविष्ट आणि सुगंधित अफगाणी बिर्याणी

Afgani Biryani Recipe : तीच तीच बोरिंग बिर्याणी खाऊन कंटाळा आला असेल तर यावेळी ट्राय करा चवदार अफगाणी बिर्याणी. ही रेसिपी जरा वेळ खाऊ आहे पण शेवटी याची जी चव मिळते ती मनाला तृप्त करून जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 12, 2025 | 09:23 AM
रात्रीच्या जेवणाला बनवा शाही मेजवानी! तीच तीच बिर्याणी नाही; यावेळी ट्राय करा चविष्ट आणि सुगंधित अफगाणी बिर्याणी

रात्रीच्या जेवणाला बनवा शाही मेजवानी! तीच तीच बिर्याणी नाही; यावेळी ट्राय करा चविष्ट आणि सुगंधित अफगाणी बिर्याणी

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय बिर्याणीचे विविध प्रकार सर्वत्र लोकप्रिय आहेत. पण बिर्याणीच्या जगात अफगाणी चिकन बिर्याणीचा स्वाद वेगळाच आहे. ही बिर्याणी फारशी तिखट नसते, उलट क्रीमी, सौम्य मसालेदार आणि रुचकर अशी तिची खासियत आहे. अफगाणिस्तानच्या पाककलेत दही, काजू, क्रीम, सुगंधी मसाले आणि बासमती तांदळाचा उत्तम मेळ घालून पदार्थ अधिक समृद्ध बनवले जातात. त्याचाच परिणाम म्हणजे अफगाणी बिर्याणी! एक अशी डिश जी पाहुणचारासाठी किंवा खास प्रसंगासाठी अतिशय उत्तम मानली जाते.

चविष्ट आणि पौष्टिक सुरळीची वडी; महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ चाखलात का? जाणून घ्या रेसिपी

या बिर्याणीमध्ये चिकन आधी दही, आलं-लसूण पेस्ट, काजूची पेस्ट आणि क्रीम यामध्ये मॅरिनेट केले जाते. त्यामुळे चिकन अत्यंत मऊसर व रसाळ होते. बिर्याणी शिजताना केशराचा सुवास आणि तुपाचा सुगंध घरभर दरवळतो. पारंपरिक मुघलई व अफगाणी खाद्यसंस्कृतीचा प्रभाव या डिशवर स्पष्टपणे दिसतो. अफगाणी चिकन बिर्याणीची चव तिखट खाणाऱ्यांसाठी साधी वाटली तरी तिचा नाजूक सुगंध, श्रीमंती आणि सौम्य मसाल्यांची जादू मन मोहवते. रायता, सलाड किंवा मिरचीचा थेचा सोबत ही बिर्याणी खाल्ल्यावर जेवणाचा अनुभव अधिकच खास बनतो. ही बिर्याणी बनवायला थोडा वेळ लागतो, पण बनविल्यावर घरातील सगळ्यांचे कौतुक मिळणार हे नक्की!

साहित्य

  • ५०० ग्रॅम चिकन (साफ करून तुकडे)
  • २ कप बासमती तांदूळ
  • १ कप दही
  • ½ कप काजू पेस्ट
  • ¼ कप फ्रेश क्रीम
  • २ मोठे कांदे (पातळ चिरून तळलेले)
  • १ मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट
  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • १ टीस्पून गरम मसाला
  • ½ टीस्पून जिरेपूड
  • १ टीस्पून धणेपूड
  • केशर दूध (१ टेबलस्पून कोमट दुधात भिजवलेले)
  • ४ टेबलस्पून तूप किंवा तेल
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
  • पुदिन्याची पाने

आर्टिफिशियल प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी अ‍ॅपल जॅम, नोट करा रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम तांदूळ धुऊन अर्धवट शिजवून घ्या.
  • चिकनला दही, आलं-लसूण पेस्ट, काजू पेस्ट, क्रीम, मीठ व मसाले लावून १ तास मॅरिनेट करा.
  • कढईत तेल गरम करून मॅरिनेट केलेले चिकन शिजवा.
  • मोठ्या भांड्यात तूप घालून तळलेला कांदा, चिकन व मसाले थर लावा.
  • त्यावर अर्धवट शिजवलेला तांदूळ पसरवा.
  • वरून केशर दूध, कोथिंबीर, पुदिना व तळलेला कांदा शिंपडा.
  • झाकण ठेवून १५-२० मिनिटे मंद आचेवर दम देऊन शिजवा
  • तयार बिर्याणी रायतासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Not just any biryani try this time the delicious and aromatic afghani biryani recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • biryani
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

चविष्ट आणि पौष्टिक सुरळीची वडी; महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ चाखलात का? जाणून घ्या रेसिपी
1

चविष्ट आणि पौष्टिक सुरळीची वडी; महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ चाखलात का? जाणून घ्या रेसिपी

Navratri 2025 : नवरात्रीच्या उपवासानिमित्त घरी बनवा हटके अन् चवदार साबुदाण्याचे थालीपीठ; सोपी-झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2025 : नवरात्रीच्या उपवासानिमित्त घरी बनवा हटके अन् चवदार साबुदाण्याचे थालीपीठ; सोपी-झटपट तयार होणारी रेसिपी

Egg Curry Recipe : झणझणीत तर्रीदार अंडा करी अगदी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा; चव चाखाल तर रेसिपीचे फॅन व्हाल
3

Egg Curry Recipe : झणझणीत तर्रीदार अंडा करी अगदी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा; चव चाखाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

बटाट्याचा मसालेदार सामोसा नाही तर हा आहे नूडल्सने भरलेला चायनीज सामोसा; नोट करा रेसिपी
4

बटाट्याचा मसालेदार सामोसा नाही तर हा आहे नूडल्सने भरलेला चायनीज सामोसा; नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.