Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिकन-मटण सोडा, 50 रुपयांच्या या पदार्थांमध्ये दडलाय प्रोटीनचा साठा! आहारात करा समावेश; लोखंडासारखी मजबूत होतील हाडं

Protein Rich Food : अनेकांना असं वाटत की प्रोटीन फक्त चिकन-मटणमध्ये दडलं आहे पण असं नाही अनेक शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीनचा भरपूर साठा आढळून येतो. याचे सेवन हाडांना मजबूती देण्यास आणि त्यांना बळकट बनवण्यास मदत करते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 31, 2025 | 08:15 PM
चिकन-मटण सोडा, 50 रुपयांच्या या पदार्थांमध्ये दडलाय प्रोटीनचा साठा! आहारात करा समावेश; लोखंडासारखी मजबूत होतील हाडं

चिकन-मटण सोडा, 50 रुपयांच्या या पदार्थांमध्ये दडलाय प्रोटीनचा साठा! आहारात करा समावेश; लोखंडासारखी मजबूत होतील हाडं

Follow Us
Close
Follow Us:
  • फिटनेस कोच धर्मा कुमार यांनी शेअर केली स्वस्त प्रोटीन रिच पदार्थांची यादी
  • हाडांना मजबूत बनवण्यास हे पदार्थ फायदेशीर ठरतात
  • रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश आरोग्यासाठी फायद्याचा ठरेल

वय वाढलं की आरोग्यच्या समस्या निर्माण होणं सामान्य गोष्ट आहे. जसजसे वय वाढते तसतशी अनेकांची हाडे कमकुवत होऊ लागतात आणि यामुळेच सांधेदुखी, स्नायू कमकुवत होणे, हातपायांमध्ये मुंग्या येणे, फ्रॅक्चरचा धोका अशा अनेक समस्या उद्भवू लागतात. आजकाल तर वृद्ध लोकांनाच नाही तर अनेक तरुणांनाही या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रोजच्या कामाच्या धावपळीत शरीर थकल्यासारखं वाटण, केसगळती आणि हाडांचं दुखणं हे सर्वच लोकांच्या जीवनाच्या एक भाग बनून राहिले आहेत.

Urine मध्ये दिसून येतात Kidney Damage चे संकेत, 5 बदल दिसताच त्वरीत भेटा डॉक्टरांना

या सर्व समस्यांचे मूळ कारण म्हणजे आपला चुकीचा आहार. आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. अशात शरीरात असणाऱ्या प्रोटीनचा साठा कमी झाला की या सर्व समस्या उद्भवू लागतात. यासाठी प्रत्येक वेळी डॉक्टरांच्या गोळ्या घेण्याची गरज नाही तर आपल्या आहारात काही प्रोटीनयुक्त पदर्थांचा समावेश करण्याची गरज आहे. अनेकांना असं वाटत की, प्रोटीन हे फक्त चिकन-मटण यामध्ये आढळून येत पण असं नाही. अनेक डाळी आणि भाज्यांमध्ये प्रोटीनचा भरपूर साठा आढळतो ज्यामुळे याचे सेवन करणे आपल्या हाडांना मजबूतीसाठी फायद्याचे ठरू शकते. फिटनेस कोच धर्मा कुमार यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वस्त आणि सहज उपलब्ध असणाऱ्या प्रोटीनयुक्त पदार्थांची यादी सांगितली आहे. या पदार्थांच्या रोजच्या जीवनात समावेश केल्यास तुम्ही तुमचं शरीर मजबूत आणि बळकट बनवू शकता.

पनीर

​पनीर हाडांसाठी फायदेशीर आहे, कारण त्यात कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आढळते. शाकाहारी लोकांसाठी हा प्रोटीनचा एक उत्तम साठा आहे. पनीरचे सेवन हाडांचे आरोग्य सुधारते आणि त्यांना निरगो ठेवण्यास मदत करते. बाजारात पनीर सहज उपलब्ध होते. भाजी, भुर्जी, पराठा अशा अनेक प्रकारे पनीरपासून चविष्ट पदार्थ तयार केले जाऊ शकतात.

अंडी

सकाळच्या नाश्त्यात खाल्ली जाणारी अंडी अनेक फायद्यांसह हाडांना मजबूत करण्यासही मदतनीस ठरते. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक घटक आढळून येतात जे हाडांची मजबूती राखण्यास मदत करतात. नियमित अंड्यांचे सेवन केल्याने हाडांची घनता वाढते आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

सोया चंक्स

सहज, सोपा आणि स्वस्त असणारा हा पदार्थ आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचा ठरतो. यात कॅल्शियम आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आढळून येतो जे हाडे मजबूत करण्यास आणि हाडाने दुखणे कमी करण्यास मदत करते. हे पचनशक्ती सुधारण्यासही मदत करते.

काळे चणे, राजमा, मसूर छोले, चवळी

आहारात कडधान्यांचा समावेश आरोग्याला अनेक फायदे मिळवून देतो. काळे चणे, राजमा, मसूर डाळ, छोले आणि चवळी यांसारखे कडधान्य फार स्वस्त दरात बाजारात उपलब्ध असतात. यापासून चविष्ट अशी भाजी तयार केली जाऊ शकते. रोजच्या आहारात यांचा समावेश केल्यास शरीरातील प्रोटीन आणि आयर्नचा साठा भरला जातो. हे शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासही मदत करते.

बेसन

अनेक भारतीय स्वयंपाकघरात बेसनाचा आवर्जून समावेश होतो. यापासून तयार केलेले पदार्थ चवीला फार स्वादिष्ट लागतात. पण अनेकांना ठाऊक नाही की याचे सेवन आपल्या हाडांच्या मजबुतीसाठीही फायद्याचे ठरते. यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने यांसारखे पोषक तत्व असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

दही

फक्त पचनासाठीच नाही तर हाडांना मजबुती मिळवून देण्यासाठीही दहीचे सेवन केले जाऊ शकते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि फ्रॅक्चरनंतर बरे होण्यास मदत करण्यासाठी दहीचे सेवन उपयुक्त ठरते. यातील पोषक घटक त्वचेला आतून पोषण देण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते.

रोज न चुकता हा एक लाडू खा, केसगळतीपासून त्वचेच्या समस्यापर्यंत सर्वकाही होईल दूर; बनवण्याची पद्धतही आहे फार सोपी

FAQ संबंधित प्रश्न

माझी हाडे निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवे?
तुमच्या आहारात भरपूर कॅल्शियमचा समावेश करा, पुरेसे व्हिटॅमिन डी घ्या, तंबाखूचे सेवन करू नका किंवा जास्त मद्यपान करू नका.

हाडे मजबूत कशामुळे होतात?
आहार आणि व्यायामाच्या संयोजनाने हाडे मजबूत राहतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Not only chicken and mutton these cheap items are also packed with protein include them in your diet to make bones strong lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • strong bones

संबंधित बातम्या

Viral तापानंतर पालकांनी घ्यावी मुलांची विशेष काळजी, लवकर बरे होण्यासाठी सोपे उपाय
1

Viral तापानंतर पालकांनी घ्यावी मुलांची विशेष काळजी, लवकर बरे होण्यासाठी सोपे उपाय

फायबरयुक्त पेरूचे हिवाळ्यात करा सेवन! सर्दी खोकल्यापासून कायमच दूर राहण्यासाठी ‘या’ वेळी करा सेवन, शरीर राहील निरोगी
2

फायबरयुक्त पेरूचे हिवाळ्यात करा सेवन! सर्दी खोकल्यापासून कायमच दूर राहण्यासाठी ‘या’ वेळी करा सेवन, शरीर राहील निरोगी

रोज न चुकता हा एक लाडू खा, केसगळतीपासून त्वचेच्या समस्यापर्यंत सर्वकाही होईल दूर; बनवण्याची पद्धतही आहे फार सोपी
3

रोज न चुकता हा एक लाडू खा, केसगळतीपासून त्वचेच्या समस्यापर्यंत सर्वकाही होईल दूर; बनवण्याची पद्धतही आहे फार सोपी

आतड्यांमध्ये साचलेला मल बाहेर कसा काढायचा? सद्गुरूंनी सांगितले 3 प्रभावी उपाय; या घरगुती पदार्थांचा करावा लागेल वापर
4

आतड्यांमध्ये साचलेला मल बाहेर कसा काढायचा? सद्गुरूंनी सांगितले 3 प्रभावी उपाय; या घरगुती पदार्थांचा करावा लागेल वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.