मेनोपॉजदरम्यान काय खावे पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकरचा सल्ला (फोटो सौजन्य - Instagram)
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर जिने करीना कपूर आणि करिष्मा कपूर यांचे नेहमी डाएट सांभाळले आहे आणि करिनाला झिरो फिगरमध्ये आणण्याचे काम केले अनेकदा पोषण टिप्स सोशल मीडियावर शेअर करत असते आणि डाएटच्या वेगवेगळ्या फॅड्सबद्दलच्या गैरसमजांना खोडून काढत नक्की कोणता आहार योग्य आहे याबाबतदेखील माहिती देत असते.
ऋजुताने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये महिलांना त्यांच्या पेरीमेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीच्या टप्प्यात योग्य पोषण कसे मिळू शकते याबद्दल काही सोपे आणि पोषक पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्या पदार्थांमुळे मेनोपॉज आणि पूर्वरजोनिवृत्तीचा काळ त्रासदायक होत नाही याबाबत आपण अधिक माहिती मिळवूया
महिलांमधील बदल
या टप्प्यामुळे महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होऊ शकतात आणि पोषण आरोग्य राखण्यात आणि मूड सुधारण्यात भूमिका बजावू शकते. “मी तुमच्या आहारात कॅल्शियम, प्रथिने, फायबर आणि चांगले चरबी मिळविण्यासाठी तसेच आनंद आणि शांती मिळविण्यासाठी तीन समंजस, परंतु खळबळजनक मार्ग सुचवणार आहे,” असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
तर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “खऱ्या महिलांसाठी तीन खरे पदार्थ, विशेषतः रजोनिवृत्ती दरम्यान आणि त्या आसपास काय खावे” ऋजुता नेहमीच योग्य पोषणचा सल्ला देत असून तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तुम्हीही 40 नंतर रजोनिवृत्ती वा प्रिमेनोपॉजच्या त्रासाला सामोरे जात असाल तर ऋजुताचा सल्ला लक्षात घेत आहारात खाली दिलेल्या पदार्थांचा नक्की समावेश करून घ्या.
ऋजुताने दिलेला सल्ला
किचनबाबत सांगितली अवस्था
किचन हा प्रत्येक महिलेचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो आणि अनेक वेळा किचन स्वच्छ केल्याशिवाय कोणतीही महिला घराबाहेर जात नाही. जेवण बनवल्यानंतर किचन स्वच्छ असणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र ऋजुता सांगते की, पेरिमेनोपॉज वा मेनोपॉजदरम्यान कोणत्याही महिलेचे किचन तुम्हाला तितके स्वच्छ दिसणार नाही. या काळात घरातील मुलांची परीक्षा, मोठ्यांचं आजारपण, स्वतःची चिडचिड या सगळ्यात महिला आपली काळजी घेणं विसरतात.
दही लावताना दुधात टाका थोडे बेदाणे, Rujuta Diwekar ने 8 पोषक लाभासाठी सांगितली हेल्दी ट्रिक
योग्य पोषणसाठी काय खावे
या टप्प्यात योग्य पोषण मिळण्यासाठी दिवेकर रजोनिवृत्तीपूर्व आणि रजोनिवृत्तीच्या महिलांसाठी खालील टिप्स ऋजुताने दिल्या आहेत, तुमच्या आहारात कॅल्शियम, फायबर, प्रोटीन या सगळ्या महत्त्वाच्या पोषणाचा समावेश असायला हवा असंही तिने यामध्ये म्हटलं आहे आणि त्यासाठी काय करावे हे सांगितले आहे
काय खावे
तुम्हालाही मेनोपॉज वा पेरिमेनोपॉजचा त्रास होत असेल तर प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ आणि डाएटिशियन ऋजुता दिवेकरचा सल्ला तुम्ही नक्कीच ऐकू शकता.