स्किन केअर रुटीनमध्ये 'या' गोष्टींचा करा समावेश
कामाच्या धावपळीमध्ये त्वचेच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. पण कामातून वेळ काढत त्वचेच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. त्वचेच्या आरोग्याची काळजी घेताना त्वचा स्वच्छ ठेवणे, क्रिम्स, लोशन, टोनर, सिरमचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. सुंदर आणि चमकदार त्वचा सर्वच महिला आणि पुरुषांना हवी असते. यासाठी महिला वेगवेगळे उपाय करतात. पण त्वचेला वरून सुंदर ठेवण्यासाठी आतून निरोगी ठेवणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. शरीराला आतून पोषण देण्यासाठी पौष्टिक आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. तसेच विटामिन सी युक्त पदार्थ त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: पायांचे घोटे काळे झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून कमी करा पायांवरील काळेपणा
चांगल्या त्वचेसाठी बाहेरून स्किन केअर फॉलो करणे गरजेचे आहे. पण आतून पोषण देणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींकडे योग्य ते लक्ष द्यावे. सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर या सतत सुंदर त्वचा आणि केसांसाठी इन्स्टाग्राम काहींना काही व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुंदर त्वचा मिळवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत? याबद्दल सांगितले आहे. या पदार्थांचे सेवन केल्यास त्वचा सुंदर आणि मुलायम होण्यास मदत होईल. चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी स्किन केअर प्रॉडक्टसोबतच हेल्दी पदार्थ खाणे सुद्धा आवश्यक आहे.
ऋजुता दिवेकर स्किनची काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स फॉलो करतात. घरचे जेवण, वेळेवर झोपणे आणि दररोज एक्सरसाइज या प्रमुख तीन गोष्टी त्या नियमित फॉलो करतात. या गोष्टी नियमित फॉलो केल्यामुळे त्वचेला आतून पोषण मिळते आणि नैसर्गिकरित्या त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी या पदार्थांचा आहारात करा समावेश.
केशर खाल्याने त्वचेला अनेक फायदे होतात. केशर तुम्ही पाण्यात किंवा दुधामध्ये भिजवून खाऊ शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात रात्रभर केशर भिजवून ठेवा., त्यानंतर सकाळी उठून पाण्याचे सेवन करा. हा उपाय १० दिवस नियमित केल्यास त्वचा नैसर्गिकरित्या उजळदार होण्यास मदत होईल. त्वचेवरील नैसर्गिक सौदर्य वाढून तुम्ही सुंदर दिसाल.
केळी खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. केळी खाल्यामुळे पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. पोटाचे आरोग्य निरोगी असल्यास चेहऱ्यावर पिंपल्स, पुरळ, ऍक्ने येत नाहीत. त्यामुळे नियमित २ किंवा ३ केळी खावीत. पोटाच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित केळी खावीत.
हे देखील वाचा: मनाली जवळ लपली आहेत ही 4 ऑफबीट डेस्टिनेशन! निसर्गासोबत निवांत क्षण घालवण्याचा आनंद घ्या
त्वचेचे सौदंर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी काजू खावेत. काजू खाल्यामुळे पिंपल्स, पुरळ, ऍक्ने इत्यादी समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे नियमित २ किंवा ३ काजूचे सेवन करावे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी काजू मदत करतात.