
डॉक्टरांनी सांगितली कांद्याला खाण्याची योग्य पद्धत, पोटातील सर्व घाण निघेल बाहेर; स्मरणशक्तीही सुधारेल
जवळपास प्रत्येक भाज्यांंमध्ये कांद्याचा आवर्जून वापर केला जातो. गावाकडे तर जेवणाच्या ताटातही कच्चा कांदा सर्व्ह केला जातो आणि तो आवडीने खाल्लाही जातो. स्वयंपाकघरात कांद्याचे महत्तव वेगळेच. यापासून अनेक पदार्थही तयार केला जातात. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. पण त्याचा फायदा आपल्याला तेव्हाच होतो जेव्हा हे पोषक घटक आपल्या शरीराला मिळतील. पोषणतज्ञ डॉ. शिल्पा अरोरा यांनी कांदा खाण्याची खास पद्धत आपल्यासोबत शेअर केली आहे, ज्यामुळे याचे फायदे आपल्या आरोग्याला मिळू शकतील.
कांदा खाण्याची योग्य पद्धत तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात आणि आपले वजन नियंत्रित ठेवण्यासही याची मदत होते. इतकेच नव्हे तर याचा फायदा आपल्या मेंदूचे कार्य सुधारण्यासही मदत करतो. चला तर मग कांद्याचे सेवन नक्की कशाप्रकारे करायला हवे ते जाणून घेऊया.
कांद्याचे सेवन कसे करावे?
आंबवलेल्या कांद्याचे फायदे काय?
जर तुमची पचनक्रिया मंद असेल तर तुम्ही वर दिल्या प्रमाणे कांद्याचे सेवन करु शकता. डॉ. शिल्पा यांनी स्पष्ट केले की कोणत्याही भाजीला आंबवल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे आतड्यांमधील फायदेशीर बॅक्टेरिया वाढतात.
या आंबवलेल्या कांद्याचे सेवन तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, यामुळे स्मरणशक्ती सुधारते.
आतड्यांतील बॅक्टेरिया वाढल्याने तुमचे अन्न चांगले पचण्यास मदत होते. मेटाबाॅलिजम वेगवान होते. याचे सेवन अतिरिक्त चरबी जमा होण्यापासून रोखते ज्यामुळे वजन नियंत्रणात करण्यास मदत होते.
नसांमध्ये का जमते चिकट प्लाक? ब्लॉकेज साफ करण्याची पद्धत तज्ज्ञांचा खुलासा, रहा हेल्दी
आंबवलेला कांदा खाण्याची योग्य वेळ कोणती?
तुम्ही जेवणासोबत याचे सेवन करु शकता. पोषणतज्ञांच्या मते, तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात आंबवलेले कांदे खाऊ शकता. पण प्रमाण लक्षात ठेवा; जास्त खाल्ल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रमाणातच याचे सेवन करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.