(फोटो सौजन्य: Pinterest)
दिवसभरात थकून हारुन घरी आल्यानंतर आपल्याला एका शांत झोपेची गरज असते. अनेकदा लवकर झोपूनही वेळेवर झोप लागत नाही ज्यामुळे सकाळी उठायला उशीर होतो, झोप पूर्ण होत नाही आणि परिणामी आपलं कामात लक्ष लागून राहत नाही. आपल्या झोपेवर अनेक गोष्टी अवलंबून असतात अशावेळी रात्री चांगली शांत झोप लागणे फार महत्त्वाचे ठरते. चांगल्या झोपेसाठी काय करावं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आहे आहारातील बदल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपल्या आहाराचा आपल्या झोपेवर मोठा परीणाम होत असतो. ज्या लोकांच्या आहारामध्ये फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात असतात त्यांना रात्री चांगली झोप लागते तर ज्या लोकांच्या आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण कमी असते त्यांना झोपेच्या समस्या उद्भवू शकतात.
श्वासावर विषारी हवेचा विनाशकारी प्रभाव, Baba Ramdev यांचे अचून उपाय, दिला मोलाचा सल्ला
आहाराचा परिणाम
ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन रोज केल्याने आपल्याला भूक कमी लागते आणि यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. केळी, किवी, चेरी, एवोकॅडो, गोड बटाटे आणि टोमॅटो यांसारखी फळे आणि भाज्या मेलाटोनिन आणि ट्रिप्टोफॅनने समृद्ध असतात, जे झोपेला चालना देतात. यांचे सेवन पचन सुधारण्यास मदत करते आणि जळजळ कमी करते. फळांचे आणि भाज्यांचे सेवन केल्याने फक्त चांगली झोपचं लागत नाही तर मेंदूही यामुळे निरोगी राहतो.
रात्रीचे जेवण कसे असावे?
रात्रीचे जेवणामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ असायला हवेत. यामध्ये तुम्ही भाज्यांचे सूप, नाचणी, दलिया, खिचडी अशा पदार्थांचा समावेश करु शकता. रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी, रात्रीचे जेवण हलके आणि संतुलित असायला हवे.
चांगल्या झोपेसाठी काय टाळावं?
चांगल्या झोपेसाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






