Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाईन डाएट प्लॅन घेणे जीवावर बेतले! १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू, चुकीचे डाएट केल्यामुळे आरोग्यावर होणार दुष्परिणाम

वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट प्लॅन फॉलो करणे आवश्यक आहे, अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरातील ऊर्जा कमी होऊन आरोग्य बिघडते. जाणून घ्या चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 10, 2025 | 03:00 PM
चुकीचे डाएट केल्यामुळे आरोग्यावर होणार दुष्परिणाम

चुकीचे डाएट केल्यामुळे आरोग्यावर होणार दुष्परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिलांसह मुलीदेखील आहार तज्ज्ञांकडून किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून डाएट प्लॅन घेतात. मात्र चुकीच्या पद्धतीने डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. केरळमधील कन्नूर चुकीचा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे 18 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी तिने ऑनलाईन डाएट प्लॅन घेतला होता. याशिवाय वजन वाढेल या भीतीने तिने जेवणे देखील बंद केले होते. मात्र याच डाएटचा तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. वजन कमी करण्यासाठी ती नेहमी जास्तीचा व्यायाम आणि द्रव अन्नपदार्थचे सेवन करत होती. या सगळ्याचा तिच्या शरीरावर गंभीर परिणाम झाला.

जीवनशैलीतील बदलांमुळे थायरॉईड कर्करोगाच्या प्रमाणात वाढ, सुरुवाच्या टप्प्यात निदान झाल्यास वाढेल जगण्याचा दर

चुकीचा डाएट केल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम:

शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी किंवा वाढलेले वजन कमी करताना अनेक लोक डाएट फॉलो करतात. मात्र चुकीचे डाएट फॉलो केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी बऱ्याचदा सकाळचे आणि रात्रीचे जेवण करणे टाळले जाते. मात्र असे केल्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी पूर्णपणे खालावते आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार उद्भवू लागतात. सकाळच्या वेळी उपाशी पोटी घरातून बाहेर गेल्यानंतर कॅन्सर किंवा टीबी सारखे गंभीर आजारांची लगेच लागण होते, ज्यामुळे संपूर्ण आरोग्यच बिघडून जाते.

निरोगी आरोग्य जगण्यासाठी शरीराला सर्व घटकांची आवश्यकता असते. आंबट, गोड, तिखट, कडू, तुरट इत्यादी सर्वच पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. मात्र अनेक लोक वजन कमी करण्याच्या नांदात पौष्टिक पदार्थ खाण्याऐवजी अतिशय कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करतात. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला जास्त ऊर्जा मिळत नाही. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर हृदयाचे कार्य बिघडू लागते. गरजेपेक्षा जास्त डाएट फॉलो केल्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. शरीरात थकवा, अशक्तपणा, कमजोरी जाणवू लागते. त्यामुळे वजन कमी करताना शरीराला ऊर्जा देण्याऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

लघवीमध्ये दिसून येतात रक्ताच्या गाठी? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, उद्भवेल कॅन्सरचा आजार

आहाराची योग्य पडताळणी करणे:

वजन कमी करताना पौष्टिक आणि शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. शरीरातील ऊर्जा कमी होईल अशा पदार्थांचे सेवन न करता शरीरातील ऊर्जा वाढेल अशाच पदार्थांचे सेवन करावे. शरीराची बांधणी योग्य ठेवणे आवश्यक आहे. शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आहारात फळे, भाज्या, कडधान्य, पालेभाज्या, ओट्स इत्यादी पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

Web Title: Online diet plan turns fatal 18 year old girl dies due to wrong diet health risks of improper dieting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • side effect
  • Weight loss
  • weight loss tips

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
1

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे की थंड पाणी? वजन कमी करण्यासाठी फॉलो करा जपानी वॉटर थेरपी, स्वच्छ होईल पोट
2

उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे की थंड पाणी? वजन कमी करण्यासाठी फॉलो करा जपानी वॉटर थेरपी, स्वच्छ होईल पोट

‘या’ आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी पपई ठरते अतिशय घातक, खाल्ल्यास शरीरावर होतील गंभीर परिणाम
3

‘या’ आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी पपई ठरते अतिशय घातक, खाल्ल्यास शरीरावर होतील गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.