Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vitamin Deficiency: दातदुखी, तोंडाची दुर्गंधीपासून झालात हैराण? 3 विटामिन्सच्या कमतरतेने होऊ शकतात दुष्परिणाम

अनेकदा दातांमध्ये पायोरियामुळे तीव्र वेदना आणि तोंडाची दुर्गंधी येते, परंतु जर तुम्ही काही महत्त्वाचे जीवनसत्त्वे असलेले अन्न खाल्ले तर अशा समस्या उद्भवणार नाहीत. यासाठी महत्त्वाची माहिती घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 29, 2025 | 10:03 AM
तोंडातून दुर्गंधी येत असेल तर कोणते विटामिन्स खावेत (फोटो सौजन्य - iStock)

तोंडातून दुर्गंधी येत असेल तर कोणते विटामिन्स खावेत (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे, आपण तोंडाच्या आरोग्याचीदेखील काळजी घेतली पाहिजे, कारण त्याशिवाय खाणे आणि पिणे कठीण होऊ शकते. सर्वप्रथम, आपण आपले दात आणि हिरड्यांचे संरक्षण करतो, जेणेकरून अन्न चघळण्यात कोणतीही अडचण येऊ नये. याशिवाय, आपण तोंडाची दुर्गंधी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण असे होत असेल तर बोलताना आपल्या तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे आपल्याला आपले मित्र, कुटुंब आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांसमोर लाज वाटते आणि आपल्याजवळही कोणी येत नाही. काही लोक त्यांच्या दातांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, ज्यामुळे त्यांना दातदुखी आणि रक्तस्त्राव यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

जर आपल्याला आपल्या दातांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर आपल्याला आपल्या दैनंदिन आहारात काय खात आहोत याकडे लक्ष द्यावे लागेल. साधारणपणे, अनेक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे, आपल्याला दातांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, यामुळे पायोरिया सारखा आजार होऊ शकतो, ज्यामध्ये तीव्र वेदनांमुळे स्थिती दयनीय होते. दंतचिकित्सक डॉ. हरिश तन्ना यांनी याबाबत अधिक माहिती या लेखातून आपल्याला दिली आहे (फोटो सौजन्य – iStock) 

विटामिन B12

विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी

चांगल्या दंत आरोग्यासाठी व्हिटामिन बी १२ खूप महत्वाचे आहे. त्याचा दातांच्या प्रतिकारशक्तीवर खूप नकारात्मक परिणाम होतो आणि ते कमकुवत होतात. हे नंतर पायरियाचे रूप धारण करू शकते. अशा परिस्थितीत, तुमच्या दैनंदिन आहारात दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि चरबीयुक्त मासे यांचा समावेश करणे महत्वाचे आहे. दही, दूध, पनीर यासारख्या पदार्थांचा तुम्ही नियमित आहारात वापर करून विटामिन बी१२ चा समावेश करून घ्या. 

कोणत्या विटामिनच्या कमतरतेने येऊ शकते कवळी लावायची वेळ, बत्तिशी गायब होण्याआधी जाणून घ्या दातांची काळजी

विटामिन सी

विटामिन सी साठी खा लिंबूवर्गीय फळं

पायरियाचे एक प्रमुख कारण म्हणजे व्हिटामिन सी ची कमतरता. हे पोषक तत्व आपली प्रतिकारशक्ती सुधारते. तसेच, त्यात असलेले गुणधर्म आपल्याला बॅक्टेरियाच्या संसर्गापासूनदेखील वाचवतात. हे पोषक तत्व मिळविण्यासाठी तुम्ही आंबट पदार्थ खाऊ शकता, ज्यामध्ये संत्री, लिंबू आणि द्राक्षे यांचा समावेश आहे. अनेक फळांमधून विटामिन सी आपल्या शरीरात सामावून घेता येते. 

विटामिन डी 

सकाळचा सूर्यप्रकाश महत्त्वाचा

आपल्या हाडांच्या बळकटीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी व्हिटामिन डी आवश्यक आहे, आपले दातदेखील या हाडांचा एक भाग आहेत, म्हणूनच व्हिटामिन डी खूप महत्वाचे ठरते. हे पोषक तत्व मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दिवसातून १५ ते २० मिनिटे उन्हात बाहेर बसणे. सकाळच्या कोवळ्या उन्हातून लवकर विटामिन डी मिळते. तथापि, हे जीवनसत्व काही विशिष्ट पदार्थ खाऊनदेखील मिळू शकते.

ब्रशने दातांची स्वच्छता करताना 1 चूक पडेल भारी; तरूणपणातच बसवावी लागेल कवळी; बाबा रामदेव यांनी सांगितली युक्ती

दातांची स्वच्छता गरजेची

नियमित करा दातांची स्वच्छता

पोषक तत्वांमुळे आपल्या दातांचे अंतर्गत आरोग्य निश्चितच सुधारते, परंतु आपल्याला त्यांच्या बाह्य स्वच्छतेसाठीदेखील पावले उचलावी लागतील. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश किंवा टूथपिक नक्की करा. जेवणानंतर दात चांगले आणि स्वच्छ घासणे महत्वाचे आहे. तुमच्या दात आणि हिरड्यांमध्ये प्लाक जमा होऊ देऊ नका. जर अन्नाचा काही भाग दातांमधील अंतरात अडकला तर डेंटल फ्लॉस वापरा आणि स्वच्छ करा. दातांची नियमित काळजी घ्या त्याकडे दुर्लक्ष करू नका. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Oral health dental pain and odour reason is vitamin b12 c and d deficiency may result bad odour pyria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 10:03 AM

Topics:  

  • teeth home remedies
  • teeth problems
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

‘या’ शाहाकारी पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात वाढेल Vitamin B12, थकवा- कमजोरी होईल दूर
1

‘या’ शाहाकारी पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात वाढेल Vitamin B12, थकवा- कमजोरी होईल दूर

Vitamin D: चिकन-मटणापेक्षा अधिक स्वादिष्ट लागते ‘ही’ शाकाहारी भाजी, विटामिन डी कमतरता करेल 100% पूर्ण
2

Vitamin D: चिकन-मटणापेक्षा अधिक स्वादिष्ट लागते ‘ही’ शाकाहारी भाजी, विटामिन डी कमतरता करेल 100% पूर्ण

नसांमधील कमजोरी म्हणजे काय? शरीरातील नसा मजबूत ठेवण्यासाठी प्रभावी ठरतील ‘हे’ उपाय
3

नसांमधील कमजोरी म्हणजे काय? शरीरातील नसा मजबूत ठेवण्यासाठी प्रभावी ठरतील ‘हे’ उपाय

मुळापासून उपटून टाकेल दातातील पायरिया, आयुर्वेदिक तज्ज्ञांनी केवळ ४ पदार्थांचा उपयोग करण्याचा दिला सल्ला
4

मुळापासून उपटून टाकेल दातातील पायरिया, आयुर्वेदिक तज्ज्ञांनी केवळ ४ पदार्थांचा उपयोग करण्याचा दिला सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.