तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी घरगुती उपाय
काही लोकांच्या तोंडाला सतत दुर्गंधी येते.श्वास घेतल्यानंतर तोंडातून येणारी दुर्गंधी ही एक सामान्य समस्या आहे. तोंडातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर समोरच्या व्यक्तीसोबत बोलणे सुद्धा कठीण होऊन जाते. तोंडातून येणारी दुर्गंधीमागे काही कारण आहे. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर तोंड स्वच्छ न केल्यामुळे तोंडाला सतत दुर्गंधी येते. दात, जीभ स्वच्छ नसेल तर ही समस्या उद्भवते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे तुमच्या तोंडातील दुर्गंधी निघून जाईल.
जेवल्यानंतर किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच जीभ स्वच्छ केले पाहिजे. नेहमी आपण दात स्वच्छ करतो पण जिभेकडे कोणाची लक्ष देत नाही. असे केल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे नेहमी जीभ स्वच्छ केली पाहिजे.
हे देखील वाचा: Heart Attack आल्यावर फक्त छातीत दुखत नाही, तर ‘या’ भागात सुद्धा होतात वेदना
तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी नियमित सकाळ संध्याकाळ एक किंवा दोन चमचे खोबरेल तेल तोंडात टाका. यामुळे तोंडातील दुर्गंधी नाहीशी होईल. खोबरेल तेल तोंडात टाकल्यानंतर दातांच्या कोपऱ्यात अडकलेली घाण निघून जाईल. तसेच दातांना कीड सुद्धा लागणार नाही.
दातांचे आणि तोंडाचे आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी लवंगचा वापर करावा. लवंग मध्ये असलेले बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतात ज्यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होऊन तोंड स्वच्छ होते. यासाठी लवंगचे एक किंवा दोन तुकडे घेऊन तोंडामध्ये ठेवा. त्यानंतर ती लवंग संपूर्ण दातांवर चोळून घ्या. यामुळे तोंडातील दुर्गंधी निघून जाईल.
हे देखील वाचा: मानसिक तणाव दूर करण्यासाठी नियमित करा ‘ही’ मुद्रा, जीवनशैलीत होईल बदल
सफरचंद सायडर व्हिनेगरचा वापर केल्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया निघून जाऊन दात स्वच्छ होतील. श्वासाची दुर्गंधी थांबेल. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर टाकून माऊथवॉश म्हणून वापर करा. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने तोंड स्वच्छ करा. हा उपाय नियमित केल्यामुळे तोंडामधील दुर्गंधी कमी होईल.