शरीरात vitamin B १२ ची कमतरता भासू लागल्यास आहारात करा 'या' भाज्यांचे सेवन
दैनंदिन आहारात बदल झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरासाठी विटामिन बी 12 अतिशय महत्वाचे आहे. विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. शरीराला विटामिन बी 12 चीआवश्यकता असते. मात्र अनेकदा शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे किंवा इतर अनेक कारणामुळे जीवनसत्त्वांची कमतरता उद्भवू लागते. झोपेतून उठल्यानंतर थकवा अशक्तपणा जाणवणे, कामाचा तणाव, आहारात पौष्टिक घटकांची कमतरता इत्यादी अनेक कारणामुळे विटामिन बी 12 ची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला विटामिन बी 12 ची वाढलेली कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या भाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
भोपळ्याची भाजी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीरातील विटामिन बी 12 ची कमतरता भरून निघते. याशिवाय यामध्ये फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर फायबर्स आढळून येतात. भोपळ्याच्या भाजीपासून तुम्ही भाजी, सूप किंवा भोपळ्याचे घारगे बनवू शकता. दैनंदिन आहारात या भाजीचे नियमित सेवन करावे.
पालकची भाजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला कॅल्शियम मिळते. याशिवाय शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता भरून निघते. पालकपासून तुम्ही सूप, भाजी, भजी, सँडविच , सॅलड इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता.
रक्तातील हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी बीटचे सेवन केले जाते. बीट खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात नियमित बीटच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. याशिवाय विटामिन बी १२ वाढवण्यासाठी नियमित बीट खावे.
ब्रोकोलीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. विटामिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी दैनंदिन आहारात ब्रोकोलीचे सेवन करावे. यामध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स इतर घटक आढळून येतात. मेंदूच्या कार्यासाठी आणि शरीराच्या निरोगी आरोग्यसाठी ब्रोकोली खावी. हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी ब्रोकोली खावी.
लहान मुलांसह मोठ्यांना कोबीची भाजी खायला आवडत नाही. कोबीची भाजी खाणे अनेक लोक टाळतात. मात्र या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी १२ आढळून येते. कोबीच्या भाजीमध्ये फायबर्स, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. भोपळा, पालक, बीट, ब्रोकोली इत्यादी भाज्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत.