ओरीचे वेट लॉस सिक्रेट
ओरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओरहान अवतरमानीने अलीकडेच अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये वजन कमी करण्याच्या त्याच्या प्रवासाबद्दल सांगितले. झिरो-शुगर डाएट फॉलो केल्याने त्याचे वजन २३ किलोने कमी झाल्याचा खुलासा त्याने यावेळी केला. ओरीने यावेळी असा विश्वास व्यक्त केला की आहारातून साखर पूर्णपणे काढून टाकल्याने केवळ वजन कमी होत नाही तर रक्तातील साखर नियंत्रित होते. आता ओरीचे वजन 50 किलो असून त्याला अत्यंत हलके वाटत असल्याचेही त्याने यावेळी सांगितले आहे.
ओरीने अरहान खानच्या प्रसिद्ध पॉडकास्ट, Dumb Biryani मध्ये वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल खुलेपणाने सांगितले आणि या काळात त्याला जाणवलेल्या आव्हानांबद्दलही सांगितले आहे. ओरीने आपली सकाळ नक्की कशी सुरू होते आणि काय खातो याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ओरीकडून नक्कीच तुम्ही टिप्स घेऊ शकता. (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
ओरीचे वेट लॉस सिक्रेट
ओरीने यावेळी सांगितले की, तो दिवसा बरेचदा पूर्ण जेवण खाणे टाळतो आणि रात्री क्वचितच जेवतो. त्याने या काळात झिरो-शुगर डाएट फॉलो करण्यावर भर दिल्याचे आवर्जून सांगितले. त्याला त्याच्या टार्गेटनुसार अजून 2-3 किलो वजन कमी करायचे आहे. ओरी पुढे म्हणाला की, शरीरात चरबी साठवून ठेवण्यात साखरेचा मोठा वाटा आहे. यामुळेच आहारतज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी आहारातून साखर वगळण्याचा सल्ला देतात.
हेदेखील वाचा – तांदळामुळे ढेरी वाढत चालली आहे? जाणून घ्या वेट लॉस करण्यासाठी कोणता तांदूळ आहे उत्तम
डाएटमधील साखरेची भूमिका
डाएटमध्ये साखर वगळण्याचा सल्ला का देण्यता येतो
साखरेमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असतेच पण त्यात पोषकतत्त्वेही खूप कमी असतात. ते जास्त प्रमाणात घेतल्याने वजन झपाट्याने वाढते आणि वजन कमी करण्याचा प्रवासही बिघडू शकतो. जेव्हा तुम्ही जास्त साखरेचे पदार्थ खातात तेव्हा त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, ज्यामुळे थेट इन्सुलिन सोडण्यास चालना मिळते. अशा परिस्थितीत शरीरात चरबी साठू लागते आणि विशेषतः पोटावरील चरबी नियंत्रणाबाहेर जाते आणि तुमची जाडी वाढते.
साखर सोडण्याची उत्तम पद्धत
साखर सोडण्याचे उपाय
जर तुम्हाला साखर कमी करायची असेल पण ते कसे करावे हे माहित नसेल तर काळजी करू नका, आम्ही काही मुद्यांच्या मदतीने तुमचे काम सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेदेखील वाचा – ‘2-2-2 वेट लॉस मेथड’ नक्की काय आहे? सर्रकन येईल वजनाचा काटा खाली
साखर कमी केल्याने काय होईल?
साखर कमी खाल्ल्यास काय होईल
काय लक्षात ठेवावे?
कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.