वेट लॉस करण्यासाठी उत्तम पद्धत (फोटो सौजन्य -iStock)
खाण्यातील साखर सोडणे, तेलाचे सेवन कमी करणे, व्यायाम वाढवणे आणि दिवसातून अधिक वेळ व्यायामाला देणे किंवा विशिष्ट पेय पिणे यासह वजन कमी करण्यासाठी लोक अनेक गोष्टींचा प्रयत्न करतात. अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही पोटाची आणि कंबरेची चरबी कमी होत नाही. मात्र यासाठी एक विशेष पद्धत उपयुक्त ठरू शकते, जी सध्या खूप प्रभावी मानली जाते.
2-2-2 Weight Loss Method असे या पद्धतीचे नाव आहे आणि यामुळे वजन कमी होते असे डाएटिशियनचे म्हणणे आहे. काय आहे ही 2-2-2 Weight Loss Method आणि कशा पद्धतीने याचा वापर करू शकतो हे आपण या लेखातून जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
2-2-2 वेट लॉस मेथड म्हणजे काय?
वेट लॉससाठी २-२-२ पद्धतीचा अवलंब (फोटो सौजन्य – iStock)
डाएटिशियन आयुषी यादवने सांगितले की, वाढते वजन कमी करण्यासाठी 2-2-2 वजन कमी करण्याची पद्धत तुम्ही वापरू शकता. यामध्ये व्यायाम, संतुलित आहारासोबतच योग्य हायड्रेशनबाबत विचार केला जातो. ज्यांना हे डाएट करायचे आहे त्यांना ताजी फळे, भाज्या आणि पाणी 2-2-2 भागांमध्ये घेण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे 2 फळे आणि भाज्या, 2 लिटर पाणी आणि दिवसातून दोनदा चालणे या गोष्टी दिवसभरात पाळाव्या लागतात.
असा सल्ला का दिला जातो?
वजन कमी करण्यासाठी योग्य सल्ला (फोटो सौजन्य – iStock)
आहारतज्ज्ञ आयुषीने सांगितल्याप्रमाणे, वजन कमी करण्यासाठी दिवसातून 2 लिटर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे, यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्याच वेळी तुम्ही भूकही चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकता.
त्याचप्रमाणे, फळे आणि भाज्या दुप्पट भागांमध्ये खाव्या लागतील जेणेकरून आवश्यक पोषक घटक मिळतील. यानंतर सकाळ-संध्याकाळ 20 ते 30 मिनिटं चालत जा. हा एक सोपा पण प्रभावी व्यायाम आहे जो शरीरातील चरबी जाळण्यास मदत करतो आणि तुम्ही लवकर वजन कमी करू शकता.
प्रसिद्ध का होत आहे ही पद्धत?
वेट लॉससाठी कोणती पद्धत वापरावी (फोटो सौजन्य – iStock)
2-2-2 वजन कमी करण्याची ही पद्धत सध्या लोकप्रिय होत आहे. कारण या पद्धतीचा अवलंब करणे सोपे आहे आणि तुम्हाला जास्त योजना करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची गरज नाही. म्हणजेच वजन कमी करण्याची ही एक सोपी पद्धत आहे जी थोड्या मेहनतीने अवलंबली जाऊ शकते.
मात्र आपल्याला हेदेखील लक्षात ठेवावे लागेल की साखर, मीठ आणि तेलाचे सेवन खूप कमी करावे लागेल. निरोगी वजन कमी करण्यासाठी दररोज 7 ते 8 तासांची शांत झोपदेखील आवश्यक आहे असेही डाएटिशियनने सांगितले आहे.
2-2-2 वेट लॉस मेथडचे फायदे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.