महिलांच्या 'या' छोट्या चुकांमुळे वाढतं आहे अंडाशयात गाठी
वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होतात. कधी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या, गर्भधारणे दरम्यान होणार त्रास, शरीरात सतत होणारे हार्मोन्सचे संतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. महिलांमध्ये आजारांचे प्रमाण अधिक आहे. अंडाशयात म्हणजे ओव्हरीमध्ये गाठी तयार होण्याची समस्या अतिशय सामान्य झाली आहे. कोणत्याही वयात महिलांमध्ये ही समस्या उद्भवू शकते. बऱ्याचदा या गाठी निर्माण झाल्यानंतर दुर्लक्ष केले जाते.(फोटो सौजन्य – iStock)
‘या’ लोकांनी चुकूनही करू नका हेअर ट्रान्सप्लांट, ट्रीटमेंटनंतर होऊ शकतो मृत्यू, वेळच व्हा सावध
महिलांच्या अंडाशयात तयार होणाऱ्या गाठी जीवघेण्या नसतात. पण यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यामुळे वेदना, अनियमित मासिक पाळी, गर्भधारणेत येणाऱ्या अडचणी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महिलांच्या कोणत्या चुकांमुळे अंडाशयात गाठी निर्माण होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्य बिघडते. महिला धावपळीच्या जीवनशैलीमुळे चुकीचा डाएट फॉलो करतात. चुकीच्या डाएटमुळे शरीरात असंख्य बदल होऊ लागतात. तळलेले किंवा तिखट पदार्थ जास्त खाल्यामुळे शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडून ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होण्याची जास्त शक्यता असते. या गाठींकडे दुर्लक्ष केल्यास त्या मोठ्या होऊ लागतात.
महिलांच्या शरीरात सतत होणाऱ्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे शरीरात बदल होऊ लागतात. मासिक पाळीमध्ये वेदना होणे, मासिक पाळी वेळेवर न येणे, रक्तस्त्राव इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. यामुळे अंडाशयात गाठी तयार होऊ लागतात.
लठ्ठपणा सारख्या गंभीर आजारामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी आरोग्यासाठी अतिशय जीवघेणी ठरते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणे, मासिक पाळीमध्ये होणारे बदल, मधुमेह इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. लठ्ठपणा वाढल्यानंतर अंडाशयात गाठी तयार होतात. त्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवावे.
शरीरात वाढलेल्या मानसिक तणावाचा परिणाम शारीरिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर मानसिक तणाव वाढतो, ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि अंडाशयात गाठी निर्माण होतात. त्यामुळे नियमित ७ किंवा ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.