सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'या' बारीक दाण्यांच्या पाण्याचे सेवन
बिघडलेली जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे रोजच्या आहारात पौष्टिक आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पचनक्रिया बिघडल्यासारखे वाटू लागते. अपचनाची समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. गॅस, अपचन, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र असे न करता घरगुती उपाय करून तात्काळ आराम मिळवावा. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही.(फोटो सौजन्य – iStock)
Mood Swings: तणावामुळे महिलांमध्ये वाढतेय मूड स्विंग्जची समस्या, तज्ज्ञांचा अभ्यास
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. यामुळे लिव्हर आणि किडनीच्या कार्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. अपचनाच्या समस्येपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर बडीशेपेचे पाणी प्यावे. बडीशेपचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बडीशेपचे पाणी प्यायल्यास किंवा अर्धा चमचा बडीशेप चावून खाल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.
आयुर्वेदामध्ये बडीशेप खाण्याचे अनेक सांगण्यात आले आहेत. जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप आणि साखर एकत्र करून खाल्यास तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित बडीशेप खावी. बडीशेपचे सेवन तुम्ही माउथ फ्रेशनर म्हणून सुद्धा करू शकता. याशिवाय पोटात झालेला गॅस, अपचन इत्यादी समस्यांपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी बडीशेपचे पाणी प्यावे.
रोजच्या आहारात तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. विटामिन सी आणि विटामिन ए ने समृद्ध असलेली बडीशेप शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. तसेच शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी प्यावे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचे संरक्षण करतात. पोटात थंडावा निर्माण करून शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत होते.