कोकणात शिमगा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. चाकरमानी मोठ्या संख्येने गावाच्या दिशेने निघतात. दरम्यान, कोकणात पालखीचा फार मोठा उत्सव असतो. गावदेवी थाटामध्ये पालखीत बसून गावागावात लोकांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः त्यांच्या घरी जाते. मायेने भरलेली कोकणी लोकं, देवाच्या स्वागताची मोठी तयारी करतात. दरम्यान, कोकणात मानपान फार पाळला जातो. अशामध्ये कोकणात राजापूरमध्ये घडलेली एक घटना आजही आठवली तर लोकांना थरथरी येते.
गावाचा गुरव होता. गावातून पालखी निघाली होती. सर्वीकडे उत्साह होता. अशामध्ये दारूच्या धुंदीमध्ये उत्साहात येऊन गुरव याने पालखीला स्पर्श केला. तो कुणाच्या नजरेत आला नाही. त्यानंतर पालखी उचलण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला, पण पालखी जागची हलेना. तिचे वजन फार जड झाले होते. पालखी जड कशी काय झाली? कुणाकडून काही चूक झाली का? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात सगळे गावकरी जमले. काय घडलं? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी देव पुजणाऱ्या गुरव याचाच घर गावकऱ्यांनी गाठला.
येथे गुन्हेगार स्वतः गुरव होता. ही गोष्ट फक्त गुरव यालाच ठाऊक होती. पण गुरव स्वतःहून थोडी सांगणार की,”माझ्यामुळेच हे सगळं घडतंय.” गुरव त्या गावकऱ्यांसोबत चूक काय घडली? याच्या शोधात लागला. गुरव काहीही करून स्वतःची चूक मान्य करेना. सगळी मंडळी गुरव याच्या गोठ्याच्या जवळच जमली होती. गुरवही तितेच होता. तितक्यात गुरवची एक म्हैस अचानक धावत सुटली आणि जवळ असलेल्या विहिरीत तिने उडी मारली. सगळे जण आश्चर्य झाले. या घटनेनंतर सगळ्यांच्या मनात गुरवबद्दल शंका पेटली. बघता-बघता गुरवच्या आठ म्हशींनी विहिरीत अचानक उडी टाकली. गावकरी गुरववर संतापले. त्याला म्हणाले की जर तू काही चूक केली असशील तर मान्य कर नाही तर अजून संकट ओढवून घेशील.
अखेर गुरव त्याची चूक मान्य करतो. पालखीची ओटी भरतो, तेव्हा कुठे पालखीचे वजन हलके होते. पण त्याच्या चुकीमुळे तो त्याचे सर्व गमावून बसतो.