Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी; तुम्ही कधी मॅगी चाट खाल्ली आहे का?

Maggie Chaat Recipe : भारताचे लोकप्रिय इन्स्टंट नूडल मॅगीचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच फॅन आहेत. यापासून चटपटीत अशी चाट देखील बनवली जाऊ शकते. आजवर ही डिश कधी ट्राय केली नसेल तर तुम्ही खूप काही मिस केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 28, 2025 | 09:56 AM
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी; तुम्ही कधी मॅगी चाट खाल्ली आहे का?

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी; तुम्ही कधी मॅगी चाट खाल्ली आहे का?

Follow Us
Follow Us:

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये झटपट तयार होणारे पदार्थ प्रत्येकालाच हवेसं वाटतात. त्यामध्ये मॅगी हा असा पदार्थ आहे की जो काही मिनिटांत तयार होतो आणि सर्व वयोगटांना आवडतो. पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या वेळेस मॅगी ही जणू प्रत्येकाची पहिली पसंती ठरते. पण रोज त्याच प्रकारे मॅगी खाल्ल्यानंतर कंटाळा येतो. अशावेळी तिच्यात थोडासा मसालेदार आणि चटपटीत ट्विस्ट दिला, तर तिचा आनंद दुप्पट होतो.

रविवार होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवा Cheese Potato Toast Sandwich, लहान मुलांसह मोठ्यांनीही आवडेल

मॅगीला जर चाटच्या स्वरूपात बनवले तर तिची चव केवळ वेगळीच नाही तर आकर्षक देखील होते. कांदा, टोमॅटो, काकडी, उकडलेले बटाटे, चाट मसाला आणि लिंबाचा रस यांची सांगड घालून तयार केलेली मॅगी चाट ही खवय्यांसाठी खास ट्रीट आहे. यामध्ये कुरकुरीत शेव टाकल्यावर तर तिचा क्रंच अजून वाढतो. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी, वेळेत कमी आणि पार्टी, मित्रमैत्रिणींच्या गप्पा किंवा कुटुंबासोबतच्या हलक्या फुलक्या वेळेत बनवायला परफेक्ट आहे. संध्याकाळच्या नाश्त्यातही तुम्ही या पदार्थाचा समावेश करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • १ पॅक मॅगी
  • १ कांदा (बारीक चिरलेला)
  • १ टोमॅटो (बारीक चिरलेला)
  • १ काकडी (बारीक चिरलेली)
  • १ उकडलेला बटाटा (चिरलेला)
  • १ हिरवी मिरची (चिरलेली)
  • १ चमचा लाल तिखट
  • १ चमचा चाट मसाला
  • चवीनुसार मीठ
  • थोडेसे कोथिंबीर
  • १ चमचा लिंबाचा रस
  • शेव (सजावटीसाठी)
बेकरी स्टाईल खुसखुशीत आणि चवदार ‘आलू पफ पेस्ट्री’ घरी कशी तयार करायची? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम पॅकेटवरील सूचनांप्रमाणे मॅगी शिजवून थंड होऊ द्या.
  • एका मोठ्या बाउलमध्ये शिजवलेली मॅगी घ्या.
  • त्यात कांदा, टोमॅटो, काकडी, उकडलेला बटाटा व हिरवी मिरची टाका.
  • आता त्यात मीठ, लाल तिखट, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून नीट मिसळा.
  • यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून शिंपडा.
  • शेवटी कुरकुरीत शेव घालून मॅगी चाट सजवा.
  • हवी असल्यास वर पुदिना किंवा चिंचेची चटणी टाकली तरी चव अफलातून लागते.
  • ही मॅगी चाट साधी मॅगीपेक्षा कितीतरी वेगळी आणि खास चवदार आहे.
  • कमी वेळेत तयार होणारा हा स्नॅक तुम्हाला नक्कीच आवडेल.

Web Title: Perfect recipe for evening snack have you ever eaten maggi chaat recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.