नवरात्रीच्या उपवासात शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी ड्रायफ्रूट स्मूदी
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. याशिवाय सर्वच महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा खाल्ला जातो. पण सतत साबुदाणा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्याच इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ड्रायफ्रूट स्मूदी बनवू शकता. स्मूदी प्यायल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. याशिवाय उपवासाच्या दिवशी दिवसभरात अतिशय कमी पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी पोट दीर्घकाळ भरलेले राहील अशा पदार्थांचे सेवन करावे. ड्रायफ्रूट खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. यामध्ये फायबर, खनिजे आणि नैसर्गिक साखर असते. त्यामुळे स्मूदी बनवताना अतिरिक्त साखरेचा अजिबात वापर करू नये. चला तर जाणून घेऊया ड्रायफ्रूट स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
बेकरी स्टाईल खुसखुशीत आणि चवदार ‘आलू पफ पेस्ट्री’ घरी कशी तयार करायची? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी