Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Periods: महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी का येते? घाबरण्याआधी जाणून घ्या यामागील कारणे, दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात आजार

Periods: बऱ्याचदा महिलांना महिन्यातून दोनदा मासिक पाळी येते. यामागे अनेक गंभीर कारणे सुद्धा असू शकतात. हार्मोन्समधील बदल, थायरॉईडचे विकार, ताणतणाव किंवा गर्भाशयासंबंधित आजारांमुळे सुद्धा मासिक पाळी दोनदा येण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 21, 2026 | 08:01 AM
महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी का येते? घाबरण्याआधी जाणून घ्या यामागील कारणे, दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात आजार

महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी का येते? घाबरण्याआधी जाणून घ्या यामागील कारणे, दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात आजार

Follow Us
Follow Us:

Periods: सर्वच स्त्रियांना महिन्यातून एकदा मासिक पाळी येते. मासिक पाळी येणे हे नैसर्गिक चक्र आहे. या दिवसांमध्ये कंबर दुखणे, पोटात वेदना, अस्वस्थता, मळमळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. ५ दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना आराम करण्याचा सल्ला दिला जातो. पण बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे आणि जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे मासिक पाळीच्या समस्या वाढू लागतात. यामुळे महिन्यातून दोनदा मासिक पाळी येते.(फोटो सौजन्य – istock)

health care: दैनंदिन जीवनातील सवयी बदला,’या’ आजारांपासून राहा दूर

मासिक पाळीचे चक्र २१ ते ३५ दिवसांचे असते. या दिवसांमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हार्मोन्समधील बदल, थायरॉईडचे विकार, ताणतणाव किंवा गर्भाशयाशी संबंधित समस्या इत्यादी कारणांमुळे मासिक पाळीच्या चक्रात अनेक बदल होतात. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरातील रक्ताची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे दोन पाळी दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया महिन्यातून दोनदा मासिक पाळी का येते? याविषयी जाणून घेऊया सविस्तर माहिती.

महिन्यातून दोनदा मासिक पाळी का येते?

पाळीचे चक्र २६ किंवा २७ दिवसांचे असेल तर महिन्याच्या १ तारखेला पाळी आल्यास महिना संपताना म्हणजेच २८ किंवा २९ तारखेला पुन्हा एकदा मासिक पाळी येते. त्यामुळे हे चक्र पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण वारंवार २१ दिवसांपेक्षा कमी अंतराने मासिक पाळी येत असेल तर दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. कारण मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या अतिरक्तस्त्रावामुळे गंभीर आजार होऊ शकतात.

मासिक पाळी लवकर येण्याची कारणे?

मासिक पाळीच्या चक्रात वारंवार बदल होण्यास हार्मोन्स आणि जीवनशैली कारणीभूत ठरते. शरीरातील संप्रेरकांची पातळी बदलणे, थायरॉईडचे विकार, विशिष्ट औषधे किंवा गर्भनिरोधक गोळ्या इत्यादींचे सेवन केल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होतो. गर्भाशयात फायब्रॉइड्स किंवा पॉलीप्स असल्यामुळे रक्तस्त्राव जास्त होण्याची शक्यता असते. कमी वयातील मुलींना मासिक पाळी येतानाचा काळ आणि महिलांमध्ये रजोनिवृत्तीचा काळ शरीरासाठी त्रासदायक ठरतो. याशिवाय प्रचंड ताण, आहारातील अचानक बदल, वजन कमी-जास्त होणे किंवा शारीरिक, मानसिक थकवा जाणवू लागल्यानंतर थेट मासिक पाळीवर परिणाम होण्याची शक्यता असते.

health news: श्वसननलिकेत अडकला शेंगदाणा ठरला जीवघेणा; जसलोकच्या डॉक्टरांनी दिले बाळाला जीवनदान

कोणत्या लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे?

सतत २१ दिवसांपेक्षा कमी अंतराने पाळी येणे.
पाळी नेहमीच्या दिवसांपेक्षा जास्त दिवस असणे.
दोन पाळ्यांच्या दरम्यान नियमितपणे रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होणे.
रक्तस्त्राव खूप जास्त प्रमाणात होत असल्यास दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येणे सामान्य आहे का?

    Ans: काही महिलांमध्ये मासिक पाळीचे चक्र लहान असल्यामुळे महिन्यातून दोन वेळा रक्तस्राव होऊ शकतो. मात्र दोन पाळींमधील अंतर सातत्याने कमी असल्यास किंवा अनियमित रक्तस्राव होत असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

  • Que: महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येण्यामागील कारणे कोणती?

    Ans: हार्मोन्समधील असंतुलन, पीसीओएस (PCOS), थायरॉईडच्या समस्या, तणाव, वजनातील अचानक बदल, गर्भाशयातील फायब्रॉइड्स आणि काही औषधांचा परिणाम यामुळे वारंवार रक्तस्राव होऊ शकतो.

  • Que: हार्मोनल असंतुलनामुळे महिन्यातून दोन वेळा पाळी येऊ शकते का?

    Ans: होय. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समधील असंतुलनामुळे मासिक पाळीचे चक्र अनियमित होऊ शकते. परिणामी अपेक्षेपेक्षा लवकर किंवा वारंवार रक्तस्राव होण्याची शक्यता असते.

Web Title: Periods why does menstruation occur twice a month before you panic learn the reasons behind it sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • menstruation health
  • Periods
  • women health

संबंधित बातम्या

Women Health: सतत तणावाखाली राहिल्यामुळे पोट वाढते,कसे कमी कराल? जाणून घ्या
1

Women Health: सतत तणावाखाली राहिल्यामुळे पोट वाढते,कसे कमी कराल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.