प्रौढांना न्यूमोकॉक्कल आजारांपासून व्यापक संरक्षण पुरविण्यासाठी फायझरने आणली २०-व्हॅलेंट न्यूमोकॉक्कल कॉन्ज्युगेट लस
एकाच डोसामध्ये फायझरची २०-व्हॅलेंट न्यूमोकॉक्कल कॉन्ज्युगेट लस (PCV) २० स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनाय (न्यूमोकॉकस) सीरोटाइप्स1 मुळे होणा-या इन्व्हेजिव्ह आणि नॉन-इन्व्हेजिव्ह न्यूमोकॉक्कल आजारांपासून संरक्षणास मदत करतात. १८ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रौढांसाठी मान्यता मिळालेली फायझरची लस भारतात याआधी उपलब्ध झालेल्या इतर कोणत्याही कॉन्ज्युगेट लसीहून अधिक न्यूमोकॉक्कल आजाराच्या सीरोटाइप्सपासून संरक्षण पुरविते.(फोटो सौजन्य – istock)
फायझरने आज भारतातील प्रौढांसाठीच्या २०-व्हॅलेंट न्यूमोकॉक्कल कॉन्ज्युगेट व्हॅक्सीन (PCV20) या नेक्स्ट-जनरेशन अत्याधुनिक लशीच्या बाजारपेठेतील पदार्पणाची घोषणा केली. सीरोटाइप्सपासून व्यापक संरक्षण पुरविणारी फायझरची लस म्हणजे प्रौढांमधील न्यूमोकॉक्कल आजारांच्या विरोधात संरक्षण पुरविण्याच्या आघाडीवर झालेल्या लक्षणीय प्रगतीची खूण आहे.
फायझरची लस बहुतांश इनव्हेजिव्ह आणि नॉन-इनव्हेजिव्ह न्यूमोकॉक्कल आजारांना कारणीभूत ठरणा-या, चिकित्सात्मकरित्या संबंद्ध २० सीरोटाइप्सपासून संरक्षणास मदत करते. यामुळे प्रदीर्घ आजारपणासह जगणा-या व्यक्तींसह सर्व प्रौढांना वेळीच व सक्रीयरित्या संरक्षण मिळणे शक्य होते. PCV20 एकदाच घ्यायच्या सिंगल शॉट लसीच्या रूपात उपलब्ध असेल व PCV20 लस घेतलेल्या व्यक्तींना संभवत: दुसरा डोस घेण्याची गरज भासणार नाही.
फायझर लि. इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर मिनाक्षी नेवाटिया म्हणाल्या, “PCV20 ही आमची २०-व्हॅलेंट न्यूमोकॉक्कल कॉन्ज्युगेट लस बाजारात दाखल करण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. २० न्यूमोकॉक्कल आजारांच्या सीरोटाइप्सपासून व्यापक सुरक्षा पुरविणारी ही लस आपल्या देशातील प्रौढांच्या लसीकरणाची वाढती गरज पूर्ण करेल, अशी आम्हाला खात्री आहे.”
५० वर्षांहून अधिक वयाच्या प्रौढ व्यक्ती, तसेच अस्थमा, COPD (क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिजिज), क्रॉनिक किडनी डिजिज आणि मधुमेहासारखे सहआजार असलेल्या व्यक्तींना न्यूमोकॉक्कल संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो, ज्यांची परिणती गुंतागूंती, हॉस्पिटलमध्ये दाखल होणे किंवा प्रसंगी मृत्यूमध्येही होऊ शकते.
वेळच्यावेळी लसीकरण करून घेणे हे न्यूमोकॉक्कल आजारांमुळे उद्भवणारे गंभीर आजारपण, हॉस्पिटलमध्ये दाखल होणे व मृत्यू यांचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. PCV सह लसीकरण करून घेणे न्यूमोकॉक्कल आजारांचे ओझे कमी करण्यासाठीचे सर्वात प्रभावी सार्वजनिक आरोग्य साधन आहे.PCV20 भारतात दाखल झाल्याने फायझरने प्रतिबंधात्मक आरोग्याप्रती प्रदीर्घ काळापासून जपलेली बांधिलकी अधिकच भक्कम झाली आहे व न्यूमोकॉक्कल लसी शोधण्याच्या बाबतीत कंपनीकडे गेल्या २५ वर्षांपासून असलेल्या अग्रेसरपणाचा पाया त्याला लाभला आहे.
फायझरमध्ये आम्ही आयुर्मान वाढविणा-या आणि त्यांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा घडवून आणणा-या उपचारपद्धती लोकांना उपलब्ध करण्यासाठी अद्ययावत विज्ञान व आमची जागतिक संसाधने उपयोगात आणतो. आम्ही आमच्या हेल्थकेअर उत्पादनांच्या शोध, विकास व उत्पादनासाठी दर्जा, सुरक्षा व मूल्य यांचे मापदंड निर्धारित करण्यासाठी झटतो. दर दिवशी, फायझरचे सहकारी आपल्या काळातील सर्वात भीतीदायक आजारांना आव्हाने देणारे स्वास्थ्य, प्रतिबंध, उपचार आणि उपाययोजना यांत प्रगती साधण्यासाठी विकसित व उदयोन्मुख बाजारपेठांत काम करतात. जगातील अव्वल दर्जाच्या बायोफार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणून आपल्या जबाबदा-यांचे सातत्याने पालन करत आम्ही जगभरात विश्वासार्ह, परवडण्याजोग्या आरोग्यसेवेला सहाय्य करण्यासाठी व तिचा विस्तार करण्यासाठी आरोग्यसेवाकर्मी, सरकारे आणि स्थानिक समुदायांशी सहयोग साधतो. १७० हून अधिक वर्षांपासून आम्ही आमच्यावर विसंबून असलेल्या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी काम करत आलो आहोत. आमच्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची ठरू शकेल अशी माहिती आम्ही आमची वेबसाइट www.pfizerltd.co.in इथे सातत्याने पोस्ट करत असतो.