
वयाच्या ७६ व्या वर्षी सुद्धा नरेंद्र मोदी 'ही' भाजी खाऊन आहेत हेल्दी! विटामिन बी १२ वाढण्यासोबतच हाडांच्या वेदना होतील कमी
वयाच्या ७६ व्या वर्षी सुद्धा नरेंद्र मोदी का आहेत फिट?
शेवग्याच्या शेंगांचे शरीराला होणारे फायदे?
विटामिन बी १२ वाढवण्यासाठी काय खावे?
Narendra Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाच्या ७६ व्या वर्षीसुद्धा कायमच फिट आणि हेल्दी दिसतात. त्यांचे फिटनेसचे भारतासह जगभरात सगळीकडे चाहते आहेत. नरेंद्र मोदी त्यांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करतात. यासोबतच सात्विक आहार घेतात. शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. वय वाढल्यानंतर हाडांची कॅल्शियम कमी होण्यासोबतच विटामिन बी १२ आणि लोहाची पातळी सुद्धा कमी होऊन जाते. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. विटामिन बी १२ कमी झाल्यामुळे नसांमध्ये वेदना वाढतात आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शेवग्याच्या पानांमध्ये शेवग्याच्या शेंगांच्या तुलनेत लोहाचे प्रमाण खूप जास्त असते.(फोटो सौजन्य – istock)
Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
शरीरातील कमी झालेली पोषण मूल्य वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. शेवग्याच्या शेंगाची भाजी, सूप किंवा इतर वेगवेगळे पदार्थ बनवून सुद्धा खाऊ शकता. शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी वरदान मानल्या जातात. यामध्ये अमिनो ॲसिड्स, कमी कॅलरीज, चांगल्या चरबीचे प्रकार, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, तांबे, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे, विटामिन ए, ई, सी, अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे उतार वयात सुद्धा कायमच हेल्दी राहण्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे.
वय वाढल्यानंतर हाडांमधील कॅल्शियम आणि इतर आवश्यक घटक कमी होऊ लागतात. हाडांचे कॅल्शियम योग्यरीत्या शोषून घेण्यासाठी शरीराला विटामिन डी ची जास्त आवश्यकता असते. शेवग्याच्या शेंगांमध्ये नैसर्गिक विटामिन डी असते. त्यामुळे आहारात कोणत्याही सप्लिमेंट्सचे किंवा गोळ्यांचे सेवन करणे गरजेचे नाही. शाकाहारी लोकांमध्ये विटामिन बी १२ ची कमतरता खूप जास्त जाणवते. ज्यामुळे स्नायूंमध्ये थकवा आणि अशक्तपणा वाढतो. या सर्व त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचे आहारात सेवन करावे.
शेवग्याच्या पानांमध्ये क्वेरसेटिन आणि क्लोरोजेनिक अॅसिडसारखे अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. संधिवात, गुडघेदुखी आणि सांधेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शेवग्याच्या शेंगांचे सूप प्यावे. यामध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. शरीराचे वाढलेले वजन, सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना आणि चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते.
शरीराला विटामिन बी सोबतच विटामिन सी ची सुद्धा आवश्यकता असते. त्यामुळे शेवग्याच्या शेंगांचे सूप पिण्याआधी तर लिंबाचा रस टाकावा. याशिवाय आहारात वेगवेगळ्या डाळींचे सेवन केले जाते. डाळीवर लिंबाचा रस टाकून खाल्ल्यास पदार्थाची चव सुधारण्यासोबतच विटामिन सी वाढण्यास मदत होते. आवळा, पेरू, शिमला मिरची, शेवगा स्मूदी, शेवगा-लेमन टी इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करावा.
Ans: नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक चर्चांमध्ये शेवग्याच्या पानांपासून (Moringa leaves) तयार केलेला पराठा खाल्ल्याचा उल्लेख केला आहे. काही वृत्तांनुसार ते आठवड्यातून एक-दोनदा हा पराठा खात असल्याचे त्यांनी पूर्वी सांगितले होते.
Ans: दूध, दही, चीज, अंडी, मासे, मांस यांसारखे B12 असलेले पदार्थ आहारात घेता येतात. शाकाहारी व्यक्तींनी fortified foods किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने B12 supplement घेण्याचा विचार करावा.
Ans: Vitamin B12 रक्तपेशी आणि नसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. वय वाढल्यानंतर काही लोकांमध्ये B12 शोषण कमी होऊ शकते, त्यामुळे कमतरतेची लक्षणे असल्यास रक्त तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला उपयुक्त ठरतो.