Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aurangabad Bench High Court : दिवाळीआधी सीजी पॉवर, गुडइयरला मोठा दिलासा! कारखाने बंद करण्याच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

Aurangabad Bench High Court : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सीजी पॉवर आणि गुडइयर साउथ एशिया टायर्स हे दोन मोठे उद्योग बंद करण्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 09, 2026 | 03:59 PM
Maharashtra Factory Closure ( महाराष्ट्रातील कारखाना बंद होणे )

Maharashtra Factory Closure ( महाराष्ट्रातील कारखाना बंद होणे )

Follow Us
Follow Us:
  • संचालन आणि सांडपाण्याच्या गुणवत्तेबाबत त्रुटी नोंदविण्यात आल्या  
  • आदेशांच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती  
  • दोन्ही कंपन्यांना तात्पुरता दिलासा 
Aurangabad Bench High Court :  दिवाळीच्या तोंडावर सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स आणि गुडइयर साउथ एशिया टायर्स हे दोन मोठे उद्योग बंद करण्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अजित बी. कडेठाणकर यांनी अंतरिम स्थगिती दिली. उद्योग बंद झाल्यास हजारो कामगारांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेत त्यांनी हा आदेश दिला. दोन्ही कंपन्यांच्या स्वतंत्र याचिकांवर ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने सीजी पॉवरला ३ नोव्हेंबर, तर गुडइयर टायर्सला ४ नोव्हेंबर रोजी उत्पादन प्रक्रिया बंद करण्याचे आदेश दिले होते. पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. जल आणि वायुप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांतील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली होती.

संचालन आणि सांडपाण्याच्या गुणवत्तेबाबत त्रुटी नोंदविण्यात आल्या

सोजी पॉवरच्या उद्योगाला ३० जून २०२७ पर्यंत उत्पादन सुरू ठेवण्याची संमती आहे. जूनमधील तपासणीत बैंक हमी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे संचालन आणि सांडपाण्याच्या गुणवत्तेबाबत त्रुटी नोंदविण्यात आल्या होत्या. मात्र, बँक हमी जमा केली असून, अन्य तांत्रिक त्रुटींबाबत स्पष्टीकरणही दिले होते. सप्टेंबरमध्ये मंडळाच्या संकेतस्थळावर आढळलेल्या

कारणे दाखवा नोटिशीला दिल्यानंतरही त्याचा विचार न करता बंदीचा आदेश काढल्याचा युक्तिवाद कंपनीने केला.
गुडइयर टायर्सला २४ ऑक्टोबर रोजी ३० सप्टेंबर २०२९ पर्यंत उद्योग सुरू ठेवण्याच्या संमतीचे नूतनीकरण देण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उद्योग बंद करण्याचे आदेश बजावण्यात आल्याचे कंपनीने न्यायालयात निदर्शनास आणले. दिवाळीच्या काळात दोन्ही उद्योग बंद झाल्यास त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम होईल.

Amravati News: साडेतीन वर्षांत ९ कोटींची फसवणूक! ९ महिन्यांत ३२ तक्रारी दाखल; ३२ गुन्ह्यांत ४ कोटींचा गंडा

आदेशांच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती

अंतिम सुनावणीत याचिका गुणवत्तेवर टिकेल किंवा नाही हा वेगळा भाग आहे, परंतु ऐन सणासुदीच्या काळात अशा प्रकारे कारखाने अचानक बंद पाडल्यास त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल. याचा फटका बसू नये म्हणून न्यायालयाने दोन्ही आदेशांच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिली. सीजी पॉवरतर्फे अॅड. सुबोध शाह, गुडइयरतर्फे अॅड. श्रीकांत व्ही. अदवंत, तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील अॅड. पी. एस. पाटील यांनी बाजू मांडली.

दोन्ही कंपन्यांना तात्पुरता दिलासा

सीजी पॉवरच्या उद्योगाची संमती ३० जून २०२७ पर्यंत, तर गुडइयर टायर्सची संमती ३० सप्टेंबर २०२९ पर्यंत वैध आहे. दोन्ही कंपन्यांच्या उत्पादन बंदी आदेशांना न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असून, प्रकरणाची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Amravati News: आंध्रात वादळाचा कहर; १५ जिल्ह्यांत नुकसान! १०,८०५ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले, वाऱ्याचा वेग ताशी १२० किमी 

Web Title: Bombay high court stays cg power goodyear closure orders sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Aurangabad Bench
  • Aurangabad news
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • pollution

संबंधित बातम्या

Child Marriage Free India Campaign : महाराष्ट्रातील शाळांमध्ये बालविवाहविरोधी जनजागृती; शिक्षण विभागाचे निर्देश
1

Child Marriage Free India Campaign : महाराष्ट्रातील शाळांमध्ये बालविवाहविरोधी जनजागृती; शिक्षण विभागाचे निर्देश

Samruddhi Mahamarg Security : समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ? भगदाडांतून गुन्हेगारांची एन्ट्री
2

Samruddhi Mahamarg Security : समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ? भगदाडांतून गुन्हेगारांची एन्ट्री

Sambhajinagar News : घाटी मेडिकल कॉलेजचा विस्तार; पीजीच्या ७३ अतिरिक्त जागांना हिरवा कंदील
3

Sambhajinagar News : घाटी मेडिकल कॉलेजचा विस्तार; पीजीच्या ७३ अतिरिक्त जागांना हिरवा कंदील

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा
4

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.