
प्रसिद्ध भारतीय शेफ विकास खन्नाच्या फिटनेसचं रहस्य (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतातील अनेक शेफ आहेत जे कमालीचे फिट आहेत आणि त्यांचा फिटनेस आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व लोकांना खूपच भावते. असाच एक सेलिब्रिटी शेफ म्हणजे विकास खन्ना. विकास खन्नाचे लाखो करोडो चाहते आहेत आणि त्याचे व्यक्तिमत्व हे कमालीचे आकर्षक आहे.विकास खन्ना केवळ त्यांच्या स्वयंपाक कौशल्यासाठीच नव्हे तर त्यांच्या फिटनेससाठी देखील लोकप्रिय आहे.
५३ वर्षांचा असूनही या सेलिब्रिटी शेफचा फिटनेस कौतुकास्पद आहे. विकास खन्ना केवळ व्यायामच करत नाहीत तर त्यांच्या आहाराबद्दल देखील ते खूप सक्रिय आहेत. विकास खन्नाचे न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट आहे तर त्याची वेगवेगळी रेस्टॉरंट्स असून तिथे जेवण्यासाठी चाहत्यांच्या रांगा लागतात. विकास खन्ना सेलिब्रिटी शेफ असूनही त्याचे कधीच खाण्यावरून नियंत्रण सुटत नाही आणि आयुष्यात त्याने स्वतःला इतके फिट कसे ठेवले आहे, याबाबत आपण अधिक माहिती घेऊया. काय आहे विकास खन्नाच्या फिटनेसचे रहस्य?
फिटनेस सिक्रेट्स
जर तुम्हाला वाटत असेल की फिटनेस राहण्यासाठी जिममध्ये जाणे आवश्यक आहे, तर तुम्ही हा गैरसमज दूर केला पाहिजे. फिटनेस राखण्यासाठी, विकास खन्नासारखे सतत काम करत राहणे आणि शारीरिक हालचाली करणे अत्यंत महत्वाचे आहे. सायकलिंग, पोहणे आणि एरोबिक्स सारख्या गोष्टींचाही तुम्ही अधिक तंदुरुस्त शरीरासाठी योगदान घेऊ शकता. विकास खन्ना नेहमी या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवतो आणि स्वतःला फिट ठेवतो.
आहाराकडे लक्ष देणे महत्वाचे आहे
तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी केवळ शारीरिक हालचाली पुरेसे नाहीत. तुम्हाला तुमच्या आहार योजनेकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. सेलिब्रिटी शेफ बाहेर खाण्यापेक्षा घरी शिजवलेले जेवण अधिक पसंत करतात. फळे, हिरव्या भाज्या, ओट्स, सुकामेवा, बदामाचे दूध आणि बरेच काही यासारखे पौष्टिक समृद्ध अन्न तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यात प्रभावी ठरू शकते. विकास खन्ना दिवसभर हॉटेलमध्ये काम करूनही जेवण मात्र घरचेच जेवतो असं त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
महत्त्वाची बाब
जर तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर दारू आणि धूम्रपान यासारख्या वाईट सवयी सोडल्या पाहिजेत. विकास खन्ना देखील या वाईट सवयींपासून दूर राहतात. फिटनेससाठी चांगली झोप घेणे देखील आवश्यक मानले जाते. याव्यतिरिक्त, तुम्ही हायड्रेशनकडे लक्ष दिले पाहिजे. या छोट्या टिप्स तुम्हाला दीर्घकाळ तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. वयाच्या ५३ व्या वर्षीही तरूणांना टक्कर देईल असे विकास खन्नाचे व्यक्तिमत्त्व आहे आणि ते त्याने अत्यंत काटेकोरपणे पाळलेल्या नियमाने जपले आहे. तुम्हीही विकास खन्नाचा आदर्श ठेऊन स्वतःच्या शरीराकडे आतापासूनच लक्ष द्यायला घ्या