प्रिया बॅनर्जीच्या मंगळसूत्राची खासियत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी लग्न केले. प्रतीकची दिवंगत आई स्मिता पाटील यांनी निधनापूर्वी खरेदी केलेल्या घरातच त्यांचे लग्न झाले. प्रतीकने आपल्या वडील आणि सावत्र भावाबहिणांना आमंत्रण न दिल्यामुळे सध्या त्याचे लग्न अधिक गाजत आहे. मात्र प्रतीक आणि प्रियाचा लग्नाच्या वेळचा लुकदेखील तितकाच चर्चेत आहे. याशिवाय अजून एक गोष्ट गाजतेय ती म्हणजे प्रियाने घातलेले मंगळसूत्र.
मंगळसूत्र गाजण्याचे कारण आहे त्याचे डिझाईन आणि त्यांच्या लग्नाचा दिवंगत अभिनेत्रीशी आणखी एक संबंध. प्रतीकने प्रियाच्या गळ्यात घातलेले मंगळसूत्र हे भावनिकरित्या अत्यंत खास असल्याचे एका इंग्रजी संकेतस्थळाने सांगितले आहे. प्रतीकला कधीही आपल्या आईचा सहवास मिळाला नाही. मात्र त्याचे त्याच्या आईवर प्रचंड प्रेम आहे हे त्याने नेहमीच सांगितले आहे आणि आता प्रियाच्या गळ्यात घातलेल्या मंगळसूत्राचा त्याच्याशी खास संबंध असल्याचे दिसून आले आहे, कसे ते जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Instagram)
प्रियाच्या मंगळसूत्राचे वैशिष्ट्य
प्रियाच्या गळ्यातील मंगळसूत्र आहे खास
प्रियाने आता घातलेले मंगळसूत्र हे स्मिता पाटील यांच्या कानातल्यांपासून बनवले होते, जे एक हृदयस्पर्शी कथा असलेले मौल्यवान दागिने होते असे सांगण्यात येते. प्रतीकच्या जन्मानंतर स्मिताजींना हे कानातले घालायचे होते, परंतु नशिबाची योजना वेगळीच होती. तिच्या स्मृतीचा सन्मान करण्यासाठी आणि तिचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी, प्रतीकने आपली आई स्मिताचे कानातले हे प्रियाच्या मंगळसूत्रात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून आयुष्याच्या या नवीन अध्यायात त्याची आई त्यांच्या जवळ राहील हा त्याचा हेतू आहे.
प्रतीकने उचललेले हे पाऊल म्हणजे आणि आई आणि बायको या दोन्ही त्याच्या जवळच्या व्यक्तींना आपल्याजवळ कायम ठेवणे हाच उद्देश दिसून येतो आणि यासाठी विविध स्तरावर प्रतीकचे कौतुकही होत आहे.
भगवी वस्त्र, भक्तीत लीन; गंगेचरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पत्नी अमृता आणि मुलीची हजेरी
प्रियाच्या मंगळसूत्राचे डिझाईन
प्रियाचे मंगळसूत्र अत्यंत नाजूक असून सोन्याच्या चैनमध्ये दोन्ही बाजूंनी दोन दोन लहान काळे मणी गुंफण्यात आले आहेत आणि वाटीच्या ठिकाणी दोन हिरे जे स्मिता पाटील यांच्या कानातले होते त्याचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. अत्यंत साधे मात्र तरीही आकर्षक असे हे मंगळसूत्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तसंच प्रियाच्या आऊटफिटस हे मंगळसूत्र खूपच आकर्षक आणि परफेक्ट मॅच होताना दिसून येत आहे.
प्रतीक प्रियाचे साधे लग्न
प्रतीक आणि प्रियाच्या लग्नाचे फोटो
प्रतीक आणि प्रियाने अगदी साधेपणाने स्मिता पाटील यांच्या घरात लग्न केले. दोघांनीही ऑफव्हाईट रंगाचे कपडे परिधान केले होते आणि दोघांचे फोटो पाहताना अत्यंत आनंदी असल्याचेही दिसून येत आहे. प्रतीकने आपले वडील राज बब्बर, सावत्र बहीण जुही बब्बर आणि आर्य बब्बर यांना आमंत्रण न दिल्याने सध्या घरातील सर्व जण नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र प्रतीकने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रतीक – प्रियाच्या लग्नाला बब्बर यांच्या घरातून एकही व्यक्ती आशीर्वाद द्यायला उपस्थित नव्हेत हे मात्र खरं!
‘अपने ही रंग में मुझको रंग दे’, अंकिता प्रभू वालावलकरच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो व्हायरल