वंधत्वावर मात करता येते का आणि असेल तर काय आहे उपाय (फोटो सौजन्य - iStock)
आजच्या जोडप्यांमध्ये वंध्यत्व ही मोठी समस्या आहे. चुकीची लाइफस्टाइल आणि अवेळी खाणे, झोपणे या सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा भाग हा अनेक आजारांना कारणीभूत ठरतोय. भारतात १५ ते २० टक्के दाम्पत्य अपत्यसुखापासून वंचित राहत असून, योग्य मार्गदर्शन आणि आयव्हीएफ उपचारातून यावर सहज मात करणे शक्य असल्याची माहिती ज्येष्ठ स्रीरोग तज्ज्ञ बिर्ला आयव्हीएफचे सेंटर डॉ. प्रमोद येरणे यांनी दिली.
वंध्यत्वाच्या वाढत्या समस्येबद्दल बोलताना डॉ. येरणे म्हणाले, आजची तरुण पिढी खूप जास्त करिअरिस्टिक आहे. पॅकेजसच्या मागे धावत असताना लग्नाचे वय कधी उलटून जाते हे अनेकांच्या लक्षातही येत नाही. योसाबत बदलती लाइफस्टाइल, तरुण मुलींमध्ये वाढती व्यसनाधीनता ही वंध्यत्वाची प्रमुख कारणे असून, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात ही समस्या अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे डॉ. येरणे यांनी नमूद केले.
अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न
बिर्ला आयव्हीएफ सेंटरच्या माध्यमातून महिलांच्या जनजागृतीसाठी ठिकठिकाणी निःशुल्क शिबिरांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून महिलांना योग्य माहिती देऊन, आयव्हीएफ उपचारातून अपत्यप्राप्ती होऊ शकते हा विश्वास त्यांना दिला जातो. नागपूर, हिंगणघाट, बालाघाट, वरुड अशा अनेक ठिकाणी नियमित शिबिरांचे आयोजन केले जाते. आययूआई, आयव्हीएफ या तंत्रज्ञानातून निपुत्रिकांना मातृत्वसुख मिळवून देता येते. लग्नानंतर दोन वर्षे बाळ न झाल्यास तत्काळ आयव्हीएफ सेंटरमध्ये यावे. बरेच जण अनेक वर्षे प्रसूतीतज्ज्ञांकडे उपचार करून चाळीशी लोटल्यानंतर सेंटरमध्ये येत असल्याचे डॉ. येरणे यांनी सांगितले.
व्यसनमुक्ती हाच उपाय
वंध्यत्वासाठी महिला ४५ टक्के तर पुरुष ४० टक्के जबाबदार आहेत. महिला आणि पुरुषांमध्ये वाढती व्यसनाधीनता हेच याचे मुख्य कारण आहे. पूर्वी व्यसनाधीनता केवळ पुरुषांमध्ये असायची. ग्रामीण भागात तंबाखूचे सेवन करणाऱ्या महिला आढळायच्या. परंतु आता शहरी भागात सर्रास तरुणी धूम्रपान करताना दिसतात. याचा थेट परिणाम महिलांच्या अपत्यप्राप्तीवर होतो. यासोबतच वाढत्या तणावामुळे समस्या वाढत असल्याचे डॉ. येरणे यांनी सांगितले.
इंग्लंड क्रिकेटर Danielle Wyatt ने शेअर केली Good News! Lesbian मुली कशा होतात आई, काय आहे प्रक्रिया
अतिशय सुरक्षित उपचार पद्धती
एखाद्या दाम्पत्याला वर्ष-दोन वर्षांपासून अपत्य नसल्यास त्यांनी वंध्यत्वाची तपासणी नक्की करावी. सुरुवातीला रक्ततपासणी आणि इतर तपासणी करून पुढील उपचारांची दिशा ठरवली जाते. बदलत्या काळानुसार अतिशय चांगल्या दर्जाचे आणि सुरक्षित इंजेक्शन तसेच इतर सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असे कपल्स असतील जे अपत्यसुखापासून वंचित आहेत त्यांना नक्कीच आयव्हीएफचा सल्ला द्यावा. यात कुठलाही धोका नाही. ज्या दाम्पत्यांना दोन-तीन वेळा आयव्हीएफमध्ये यश आले नाही त्यांनाच पुढे सरोगसीचा पर्याय सांगितला जातो. विशेष म्हणजे यासाठी तज्ज्ञ समुपदेशक, मार्गदर्शक आणि ज्यांची आर्थिक स्थिती बरी नाही अशांसाठी शून्य टक्के व्याजदरावर कर्ज सुविधा उपलब्ध असल्याचे आयव्हीएफ तज्ज्ञ डाॅ. प्रमोद येरणे यांनी सांगितले.
भीती, दडपण, तणाव आणि व्यसनाधीनता ही वाढत्या वंध्यत्वाची कारणे आहेत. आनंदी आणि व्यसनमुक्त जीवनशैली उत्तम आरोग्याचे गमक आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात वंध्यत्वाची समस्या मोठी आहे. निपुत्रिक जोडप्यांसाठी मोफत शिबिरांचे आयोजन केले जाते. योग्य वयात उपचार घेऊन अपत्यसुखाचा आनंद घ्यावा, असेही डॉ. प्रमोद येरणे म्हणाले.






