
फोटो सौजन्य सोशल मीडिया
सलमान अयुब खान (२८, रा. अंतुजीनगर, भांडेवाडी) असे मृत कामगाराचे नाव आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सलमान हा सहकारी कामगार अक्षय बेलकर याच्यासोबत ट्रॉमल मशीनवर चढून कचरा स्वच्छ करण्याचे काम करीत होता. याचदरम्यान अचानक त्याचा पाय घसरला आणि तो मशीनमध्ये अडकला.
या अपघातात सलमान गंभीर जखमी झाला. घटनेनंतर प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली आणि त्याला उपचारासाठी पारडी परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
Nagpur News : जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश
घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आला. सलमानचे वडील अयुब खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, सलमानच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय आणि प्रकल्पातील कामगारांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती लक्षात घेऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यांना योग्य नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे.
Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
महापालिकेने कचरा वर्गीकरणाचे काम एसयूएसबीडीई कंपनीकडे सोपवले आहे. मात्र, या प्रकल्पात घडलेल्या अपघातामुळे कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मशीनची स्वच्छता करताना ती पूर्णपणे बंद होती का, कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने पुरवण्यात आली होती का आणि सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते का, याची तपासणी होणे गरजेचे आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे घडला आणि त्यामागे कोणाचा निष्काळजीपणा आहे का, याचा तपास वाठोडा पोलीस करीत आहेत.