होममेड सीरम बनवण्याची सोपी कृती
चेहऱ्याचे सौंदर्य उठून दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. सुंदर दिसण्यासाठी कधी फेशिअल करून घेणे, तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम्स वापरणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा त्वचेवर हवा तसा ग्लो येत नाही. त्वचेचे सौंदर्य वाढवताना डोळ्यांच्या भुवया आणि पापण्यांची सुद्धा तितकीच काळजी घेतली जाते. भुवया गडद दिसण्यासाठी त्यावर काळ्या रंगाची पेन्सिल किंवा इतर प्रॉडक्ट लावले जातात. मात्र काहीवेळ झाल्यानंतर त्वचेवर लावलेले प्रॉडक्ट निघून जातात. शिवाय हल्ली बाजारात पापण्या आणि भुवया दाट करण्यासाठी अनेक ट्रीटमेंट आणि प्रॉडक्ट उपलब्ध झाले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून डोळ्यांवरील भुवया आणि पापण्या दाट गडद करण्यासाठी होममेड सीरम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेसंबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केमिकल ट्रीटमेंट किंवा उपाय करण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचेचे सौंदर्य काळ टिकून राहते आणि त्वचा सुंदर दिसते. घरगुती सीरम तयार करण्यासाठी बदाम, खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, एरंडेल तेल, पेट्रोलियम जेली, विटामिन ई कॅप्सूलचा वापर करावा. या सर्व पदार्थांमध्ये केसांच्या वाढीसाठो आवश्यक असलेले गुणधर्म आढळून येतात. शिवाय यामुळे केसांची मूळ मजबूत आणि निरोगी राहतात.
सीरम तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मंद आचेवर बदाम भाजून घ्या. भाजलेले बदाम बारीक करून पावडर तयार करा. काचेच्या बाटलीमध्ये भाजून घेतलेल्या बदामाची पावडर टाकून वरून सर्व तेलांचे मिश्रण ओतून घ्या. सगळ्यात शेवटी त्यात विटामिन ई कॅप्सूल टाकून मिक्स करा. सर्व मिश्रण बाटलीमध्ये भरून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले सीरम रात्री झोपण्याआधी भुवयांवर लावून ठेवा आणि हलक्या हाताने मसाज करा. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास भुवया आणि पापण्यांवरील केसांची चांगली वाढ होईल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचेचे सौंदर्य कायम टिकून राहते. भुवया आणि पापण्यांना सीरम लावल्यास पातळ झालेले केस दाट आणि उठावदार दिसतील. भूवयांवरील केस जाड आणि गडद करण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या ट्रीटमेंट करातात, मात्र असे करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावे.