
प्रायव्हेट पार्ट राहील कायमच स्वच्छ! UTI धोका टाळण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील प्रभावी
बऱ्याचदा महिला आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर दुर्लक्ष करतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. पण अनेकदा लघवी करताना जळजळ होणे, वेदना होणे किंवा इतरही समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला डॉटरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेतात, पण यामुळे काही काळापुरताच आराम मिळतो आणि कालांतराने पुन्हा एकदा लघवीसंबंधित समस्या उद्भवू लागतात. हार्मोनल बदल, पाण्याचे कमी सेवन, आहारात होणारे बदल, चुकीच्या सवयी आणि चुकीचे अंतर्वस्त्र घातल्यामुळे लघवीसंबंधित समस्या उद्भवू शकतात. लघवी मार्गात वाढलेले युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन शरीरासाठी अतिशय धोकादायक ठरते. त्यामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या सवयी बदलणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी कोणत्या सोप्या टिप्स फॉलो करून शरीराची काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
Urine मध्ये दिसून येतात Kidney Damage चे संकेत, 5 बदल दिसताच त्वरीत भेटा डॉक्टरांना
शरीराच्या नाजूक अवयवांची कायमच स्वच्छताराखणे आवश्यक आहे. अन्यथा इन्फेक्शनचा धोका वाढण्याची शक्यता असते. महिला शरीराच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष देत नाहीत. बाथरूममध्ये जाऊन आल्यानंतर कायमच हात पाय स्वच्छ धुवणे आवश्यक आहे. कारण गुदमार्गातील जीवाणू मूत्रमार्गात जाण्याचा धोका असतो. हे विषाणू मूत्रमार्गात गेल्यामुळे लघवी करताना जळजळ होणे, वेदना होणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे शरीराची स्वछता राखणे आवश्यक आहे.
शरीराला पाण्याची कायमच आवश्यकता असते. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय शरीर स्वच्छ होते. लघवीसंबंधित इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे किडनीमधील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. तसेच पाण्यामुळे मूत्रमार्गातील नाजूक विषाणू बाहेर पडून जातात आणि संसर्गाचा धोका कमी होतो. त्यामुळे आहारात साखरयुक्त पेये, कोल्डड्रिंक्स किंवा जास्त कॅफीन असलेले पदार्थ खाऊ नये.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे काहीवेळा महिला जास्त वेळ लघवी अडकवून ठेवतात. यामुळे किडनीवर तणाव निर्माण होतो. तसेच लघवी जास्त वेळ दाबून ठेवल्यास मूत्रमार्गात बॅक्टरीया वाढतात आणि आरोग्य बिघडते. त्यामुळे कोणत्याही वेळेस लघवीला झाल्यास ती दाबून ठेवू नये. तसेच झोपण्याआधी आणि अंघोळीला जाण्याआधी लघवीला जावे.
रोजच्या आहारात शरीराला थंडावा देण्याऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात ताक, दही, लिंबू सरबत आणि प्रोबायोटिक युक्त पेयांचे सेवन केल्यास शरीर कायमच थंड राहील. विटामिन सी युक्त पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहील आणि आरोग्य सुधारेल. संत्री, आवळा, लिंबू, टोमॅटो इत्यादी पदार्थ खावेत.
Viral तापानंतर पालकांनी घ्यावी मुलांची विशेष काळजी, लवकर बरे होण्यासाठी सोपे उपाय
मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) म्हणजे काय?
हा मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागाचा संसर्ग आहे, ज्यात मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रमार्ग किंवा मूत्रमार्गाचा समावेश होतो.शरीरातील संसर्गाचा एक सामान्य प्रकार आहे.
UTI ची कारणे काय आहेत?
बहुतेकवेळा ‘ई. कोलाय’ नावाचे जीवाणू मूत्रमार्गाच्या उघड्या भागात प्रवेश करतात आणि वाढू लागतात.लैंगिक क्रियाकलापांदरम्यान जीवाणू मूत्रमार्गात ढकलले जाऊ शकतात. काहीवेळा मधुमेह, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती किंवा मूत्रमार्गात अडथळे (जसे की किडनी स्टोन) यामुळे धोका वाढतो.
UTI ची लक्षणे कोणती आहेत?
लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे.वारंवार लघवीला होणे.पोटात दुखणे किंवा अस्वस्थता.लघवीचा रंग गडद होणे किंवा वास येणे.मुलांमध्ये, बेड ओला करणे किंवा जळजळ झाल्यामुळे लघवी टाळण्याचा प्रयत्न करणे.