
किडनी स्टोनपासून कसे स्वतःला दूर ठेऊ शकता (फोटो सौजन्य - iStock)
काय आहेत कारणं
मूत्रपिंडातील खडे होण्यामागची कारणं म्हणजे पाणी कमी पिणे. मीठ, प्रथिनं आणि प्रक्रिया केलेले अन्न जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूत्रपिंडात खडे तयार होतात. कोरडी हवा आणि घामाचे प्रमाण कमी झाल्याने तहान देखील कमी लागते. ज्या लोकांना मूतखड्याचा इतिहास आहे किंवा लठ्ठपणा, मधुमेह किंवा संधिविकार यासारख्या आजारांचा वैद्यकिय इतिहास आहे त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक असतो.
Kidney Stone: हिवाळ्यात वाढतेय मुतखड्याची समस्या, कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
किडनी स्टोनची लक्षणे
पाठीच्या खालच्या भागात किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ होणे, मळमळ किंवा उलट्या होणे, फेसाळ किंवा लालसर लघवी होणे तसेच वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे ही लक्षणे दिसून येतात. वेळीच उपचार न केल्यास मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान होते किंवा संसर्ग होतो. किडनी स्टोनवर तज्ज्ञांकडून त्वरीत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
किडनी स्टोन उपचार
किडनी स्टोनवर उपचार हे त्या खड्याच्या आकारावर आणि प्रकारावर अवलंबून असतात. लहान खडे बहुतेकदा नैसर्गिकरित्या निघून जातात. मोठ्या दगडांना मात्र शॉक वेव्ह थेरपी (लिथोट्रिप्सी), युरेटेरोस्कोपी सारख्या वैद्यकीय प्रक्रियेची आवश्यकता भासते.
किडनी फेल होण्याची राहणार नाही भिती, 5 पदार्थांचा करा आहारात समावेश
प्रतिबंधात्मक उपाय आणि व्यवस्थापन कसे कराल