किडनीसाठी उत्तम पदार्थ
किडनीचे आरोग्य आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, कारण ती शरीरात फिल्टरप्रमाणे काम करते, जर त्यात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाली तर शरीरात अनेक प्रकारची घाण जमा होऊ लागते, ज्यामुळे रोगांचा धोका वाढतो. जास्त सोडियमयुक्त खाद्यपदार्थ, तेल, मसाले, अल्कोहोल यासारख्या गोष्टींमुळे किडनीला गंभीर हानी पोहोचते, पण तुम्हाला माहीत आहे का कोणते पदार्थ किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी काही खास आहार अथवा पदार्थ आहेत, ज्याचे नियमित सेवन केल्याने आपण किडनी निरोगी ठेवू शकतो. न्यूट्रिशनिस्ट निखिल वत्स यांनी अशाच काही पदार्थांबाबत सांगितले आहे, जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
पाणी
पाणी पिणे आवश्यक
कोणत्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिल्यांदा पाणी व्यवस्थित पित आहात की नाही हा प्रश्न हमखास विचारण्यात येतो. मूत्रपिंडासाठी योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करणे महत्वाचे आहे. नियमित पाण्याचे योग्य सेवन हे मूत्रपिंड स्वच्छ करण्यास आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
हेदेखील वाचा – उष्णतेच्या परिणामाने सडू शकते किडनी, या लक्षणांपूर्वी करा 4 उपाय
ताजी फळे आणि भाज्या
ताज्या फळ-भाज्यांचा करा समावेश
किडनीच्या आरोग्यासाठी ताजी फळे आणि भाज्याही महत्त्वाच्या असतात. विशेषतः फळांमध्ये असलेले फायबर किडनीला अनेक आजारांपासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तर हिरव्यागार भाज्या या किडनीतील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे हंगामी भाज्यांवरही जास्त भर द्यावा.
दही
दही ठरते फायदेशीर
दुग्धजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात, ज्यामध्ये पोट स्वच्छ ठेवण्यासाठी दही खाल्लं जातं, पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की त्यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे किडनीचं आरोग्य सुधारतं. दही हे पोट शांत ठेवण्यासाठीही उपयोगी ठरतं. किडनीमध्ये होणारी जळजळ शमविण्यासाठी दह्याचा फायदा होतो.
मुळा
मुळा ठरतो किडनीसाठी वरदान
मुळा ही भाजी किडनीसाठी फायदेशीर आहे, कारण त्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे किडनी खराब होण्याचा धोका कमी होतो. तुम्ही आहारात मुळ्याची भाजी, मुळ्याची कोशिंबीर, पराठे अशा पदार्थांचा समावेश नियमित करून घ्यायला हवा.
हेदेखील वाचा – मान्सून आणि किडनी आजारांमध्ये नेमका संबंध काय?
मखाना
मखाण्याचा करा समावेश
पाण्यात उगवलेले मखना हे अतिशय पौष्टिक अन्न आहे, ते उच्च फायबरचा स्त्रोत आहे ज्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारते, ते कमी तेलाने शिजवण्याचा प्रयत्न करा. मखाणा हा आरोग्यासाठी उत्तम ठरतो. नाश्त्यामध्ये तुम्ही अधिक मखाण्याचा उपयोग करू शकता. यामधील फायबर तुम्हाला अधिक काळ पोट भरलेले ठेवण्यासही मदत करते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.