Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अ‍ॅक्टरेक’च्या प्रोटॉन थेरपीचा कर्करुग्णांना दिलासा! आतापर्यंत एकूण ९०० रुग्णांवर उपचार, ४०० हून अधिक लहान मुलांचा समावेश

अ‍ॅक्टरेक येथील प्रोटॉन थेरपी केंद्रात दर महिन्याला सरासरी ७५ ते ७६ रुग्णांवर उपचार केले जातात. प्रत्येक रुग्णाच्या उपचारासाठी साधारण ४० मिनिटे लागतात. प्रोटॉन थेरपी ही रेडिएशन उपचाराची अत्याधुनिक पद्धत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 10, 2026 | 10:40 AM
'अ‍ॅक्टरेक'च्या प्रोटॉन थेरपीचा कर्करुग्णांना दिलासा! आतापर्यंत एकूण ९०० रुग्णांवर उपचार

'अ‍ॅक्टरेक'च्या प्रोटॉन थेरपीचा कर्करुग्णांना दिलासा! आतापर्यंत एकूण ९०० रुग्णांवर उपचार

Follow Us
Close
Follow Us:

कर्करोग उपचारातील अत्याधुनिक तंत्रज्ञान मानल्या जाणाऱ्या प्रोटॉन थेरपीद्वारे खारघर येथील टाटा मेमोरियलच्या ‘अॅक्टरेक’ केंद्रात आतापर्यंत सुमारे ९०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यापैकी ४०० हून अधिक रुग्ण लहान मुले म्हणजे एकूण रुग्णसंख्येच्या सुमारे ४४ टक्के लहान मुले आहेत प्रोटॉन थेरपी केंद्र १५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरु झाले असून कर्करोग उपचारातील ही सुविधा देशात अत्यंत मर्यादित ठिकाणी उपलब्ध असून रुग्णांना तुलनेने कमी दुष्परिणामांसह उपचार मिळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. पत्र संचार कार्यालय (पीआयबी) यांच्यावतीने आयोजित भेटीदरम्यान या प्रोटॉन थेरपी केंद्राची माहिती देण्यात आली. राष्ट्र उभारणीसाठी विविध क्षेत्रांत सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने अशा भेटी आयोजित केल्या जातात.(फोटो सौजन्य – istock)

लघवी दीर्घकाळ थांबवून ठेवल्यामुळे किडनी-मूत्राशयावर होतो गंभीर परिणाम! इन्फेक्शन रोखण्यासाठी करा ‘हे’ उपाय

अ‍ॅक्टरेक येथील प्रोटॉन थेरपी केंद्रात दर महिन्याला सरासरी ७५ ते ७६ रुग्णांवर उपचार केले जातात. प्रत्येक रुग्णाच्या उपचारासाठी साधारण ४० मिनिटे लागतात. प्रोटॉन थेरपी ही रेडिएशन उपचाराची अत्याधुनिक पद्धत आहे. या थेरपीचा उपयोग प्रामुख्याने स्कल बेस, न्यूरो कर्करोग, लहान मुलांमधील कर्करोग, हाडांचे कर्करोग तसेच लिव्हर, पॅनक्रियाज आणि प्रोस्टेट कर्करोग अशा विविध प्रकारच्या कर्करोगांवर उपचारासाठी केला जातो.

कशी करतात थेरपी?

ही एक अत्याधुनिक सुविधा आहे. या उपचार यंत्रात रुग्णाभोवती ३६० अंशात हे रोटेशन गॅन्ट्री फिरून पेन्सिल बीम स्कॅनिंग (पीबीएस) तंत्रज्ञानासह इंटेन्सिटी मॉड्‌युलेटेड प्रोटॉन थेरपी दिली जाते, अशी माहिती डॉ. सुब्रमण्यम यांनी दिली. विशेषत लहान मुलांमध्ये दीर्घकालीन दुष्परिणाम कमी करण्यासाठी प्रोटॉन थेरपी प्रभावी ठरत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या उपचारामुळे देशभरातून कर्करोगग्रस्त रुग्ण खारघर येथील या केंद्राकडे उपचारासाठी येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

रमजान दरम्यान शरीरात वाढू शकते हायड्रेशनची समस्या! जाणून घ्या युरोलॉजिस्ट डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती

टीएमसीचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी अ‍ॅक्ट्रेक येथील प्रोटॉन थेरपी सेंटर हे टीएमसीच्या सर्व गरजू रुग्णांना, उपचारांसाठी पैसे देण्याची क्षमता विचारात न घेता, अत्याधुनिक कर्करोग उपचार प्रदान करण्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे म्हटले.या थेरपीसाठी रुग्णांची प्रतीक्षा यादी असते. रुग्णांसाठी उपचाराचा खर्च ठरलेले असून संस्थेकडून येणाऱ्या रुग्णांना साधारण ५ लाख रुपयांत उपचार केले जातात.तर खासगीसाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च येतो, असे अ‍ॅक्टरेकचे डॉ. सुब्रमण्यम यांनी सांगितले

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Proton therapy of actrec brings relief to cancer patients so far a total of 900 patients have been treated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Cancer Awareness
  • Cancer prevention
  • cancer risks

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.