Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा राजस्थानची फेमस डिश मलाई प्याज

ही राजस्थानची मलाई प्याज़ भाजी एकदा करून बघा, नक्कीच तुमच्या जेवणात राजेशाही चव आणेल. कांदा, दही आणि निवडक मसाल्यांपासून बनवलेली ही सोपी, झटपट आणि मसालेदार रेसिपी जेवणाची चव आणखीनच वाढवते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 24, 2025 | 12:58 PM
भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा राजस्थानची फेमस डिश मलाई प्याज

भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा राजस्थानची फेमस डिश मलाई प्याज

Follow Us
Follow Us:

राजस्थानची ओळख फक्त किल्ले, राजवाडे आणि वाळवंटापुरती मर्यादित नाही, तर तेथील खाद्यसंस्कृतीसुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे. राजस्थानी जेवण म्हटलं की आपल्याला लगेच दाल-बाटी-चूरमा, गट्टे की सब्जी, कढी यांची आठवण येते. पण या पारंपरिक पदार्थांबरोबरच काही अनोख्या आणि हटके रेसिपी सुद्धा राजस्थानच्या खानपानात दिसतात. त्यातीलच एक खास आणि चविष्ट डिश म्हणजे मलाई प्याज़.

Ganesh Chaturthi 2025 : हटक्या पदार्थाने करा बाप्पाला खुश; यंदा प्रसादासाठी बनवा सुगंधित आणि गोड चवीने भरलेले ‘पान मोदक’

या डिशमध्ये कांद्याचा गोडसरपणा, मसाल्यांचा तिखटपणा आणि मलाईची गोडसर मखमली चव एकत्र येऊन अतिशय अप्रतिम असा स्वाद तयार होतो. ही भाजी साधी असली तरी तिची चव रेस्टॉरंट स्टाईल डिशेसना स्पर्धा देते. खास करून जेव्हा घरात काही पाहुणे येतात किंवा दुपारच्या/रात्रीच्या जेवणाला थोडं वेगळं बनवायचं असतं, तेव्हा मलाई प्याज़ हा उत्तम पर्याय ठरतो. राजस्थानमध्ये कांदा हा जेवणाचा एक अविभाज्य भाग आहे. उष्ण हवामानात कांद्याचे सेवन शरीराला थंडावा देतं, त्यामुळे कांद्याचे विविध पदार्थ तिथे लोकप्रिय आहेत. मलाई प्याज़ ही डिश साध्या साहित्याने बनते, पण तिचा राजेशाही स्वाद जीभेला चवदार अनुभव देतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • कांदे – २ मोठे (बारीक काप करून)
  • तेल / तूप – २ टेबलस्पून
  • जिरे – १ टीस्पून
  • आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • हिरवी मिरची – २ (बारीक चिरलेली)
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • धणेपूड – १ टीस्पून
  • जिरेपूड – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कसुरी मेथी – १ टीस्पून
  • मलाई (फ्रेश क्रीम) – ½ कप
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या थाळीत करा या पारंपरिक पदार्थाचा समावेश; जाणून घ्या खुसखुशीत चिरोट्यांची रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम सर्वप्रथम कढईत तेल/तूप गरम करून त्यात जिरे टाकून फोडणी करून घ्या.
  • त्यात आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून सुवास येईपर्यंत परतून घ्या.
  • आता बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
  • त्यात हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि मीठ घालून नीट मिसळा.
  • गॅस मंद आचेवर ठेवून त्यात मलाई घालून हलक्या हाताने ढवळा.
  • वरून कसुरी मेथी चुरून टाकल्यास अप्रतिम सुगंध आणि चव येते.
  • शेवटी हिरवी कोथिंबीर घालून गरमागरम मलाई प्याज़ चपाती, फुलका किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.
  • हवे असल्यास कांद्याऐवजी शलोट्स (लहान कांदे) वापरले तरी चवदार लागतात.
  • मलाई ऐवजी दुधाची साय वापरली तरी चालते.
  • ही डिश तिखटसर खाल्ली तर अधिक स्वादिष्ट लागते.

Web Title: Rajasthan famous dish malai piyaj recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • marathi recipe
  • onion bhaji
  • rajasthan

संबंधित बातम्या

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
1

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात
2

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’
3

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.