
Matrutirth Sindkhed Raja Tourism Development
यासंदर्भात सोमवारी मुंबई येथील मंत्रालयात पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ कार्यदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या पर्यटन विकास आराखड्यातील विविध प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित कामांची व्यवहार्यता तपासण्यासाठी पर्यटन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जागांची पाहणी करावी, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले होते.
त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता संजय पाटील, उपअभियंता कल्याण भोसले, कनिष्ठ अभियंता विजय नागरे आणि योगेश राणे यांनी सिंदखेडराजाला भेट दिली. यावेळी प्रस्तावित पर्यटन विकासकामांच्या जागांची पाहणी करून उपलब्ध क्षेत्र, आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यटकांसाठी करावयाच्या सोयी-सुविधा आणि विकासकामांचा प्राधान्यक्रम यांचा आढावा घेण्यात आला. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच येथील पर्यटनस्थळांचा नियोजनबद्ध विकास करण्याचा उद्देश या आराखड्यामागे आहे.
पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण झाल्यास सिंदखेडराजातील पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधीही वाढू शकतात. आ. मनोज कायंदे यांच्या पुढाकारातून पर्यटन विकासासाठी सुरू केला आहे.असलेला पाठपुरावा आता प्रत्यक्ष पाहणीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे प्रस्तावित विकासकामांना प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी सुरू होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करणे, पर्यटनस्थळांचा विकास करून पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, हा विकास आराखड्याचा प्रमुख उद्देश आहे. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
FDAची पुण्यात ५०१ औषध आस्थापनांवर कारवाई; विक्रेत्यांवर सर्वाधिक कारवाई, ३६७ परवाने निलंबित
Ans: मातृतीर्थ सिंदखेडराजा हे राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
Ans: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रस्तावित विकासकामांच्या ठिकाणांची पाहणी केली.
Ans: पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.