Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीट कच्चे खावे की शिजवून? ‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नये बीटचे सेवन, अन्यथा उद्भवतील किडनी स्टोन आणि अपचनाच्या समस्या

बीट खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण अपचन, किडनी स्टोन किंवा बद्धकोष्ठतेच्या त्रासाने त्रस्त असलेल्या लोकांनी बीटचे सेवन करू नये. यामुळे शरीरसंबंधित समस्या वाढून आरोग्य बिघडू शकते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 08, 2026 | 05:30 AM
बीट कच्चे खावे की शिजवून? 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये बीटचे सेवन, अन्यथा उद्भवतील किडनी स्टोन आणि अपचनाच्या समस्या

बीट कच्चे खावे की शिजवून? 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये बीटचे सेवन, अन्यथा उद्भवतील किडनी स्टोन आणि अपचनाच्या समस्या

Follow Us
Follow Us:

बीट खाण्याचे फायदे?
बीट कच्चे खावे की शिजवून?
बद्धकोष्ठता आणि किडनी स्टोनचा धोका असल्यास बीट खावे की नाही?

धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराकडे खूप जास्त दुर्लक्ष होते. जीवनशैलीतील चुकीच्या सवयी, वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे शरीरावर नकळतपणे खूप मोठा परिणाम होतो.रोजच्या आहारात होणारे छोटे मोठे बदल शरीरावर गंभीर परिणाम करतात. धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. बीट खाल्ल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. लालचुटुक बीट शरीरासाठी वरदान मानले जाते. यामध्ये फायबर, फोलेट, पोटॅशियम, विटामिन सी आणि नैसर्गिक नायट्रेट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तसेच शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते.(फोटो सौजन्य – istock)

मूळव्याधीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात मिळेल वेदनांपासून आराम

बीट कच्चे खावे की शिजवून?

बाजारातून बीट विकत आणल्यानंतर ते कच्चे खावे की शिजवून असे अनेक प्रश्न कायमच निर्माण होतात. काहींना बीट कच्चे खायला आवडते तर काहींना शिजवलेले बीट खायला खूप जास्त आवडते. कच्चे बीट खाल्ल्यामुळे त्यातील विटामिन सी शरीराला पूर्णपणे मिळते. पण शिजवलेले बीट सहज पचन होते. अनेकांना शिजवलेले बीट खाल्ल्यानंतर गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यामुळे बीट शिजवताना त्याला हलकीशी वाफ काढून खावे. जास्त शिजवलेले बीट खाल्ल्यास त्यातील आवश्यक पोषक घटक नष्ट होऊन जातात.

बद्धकोष्ठता आणि किडनी स्टोनचा धोका:

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असलेल्या रुग्णांनी बीटचे सेवन अतिशय कमी प्रमाणात करावे. कारण जास्त बीट खाल्ल्यास पोट फुगणे किंवा पोटात गॅस होण्याची जास्त शक्यता असते. जुनाट बद्धकोष्टता असलेल्या व्यक्तींसाठी बीट खाणे फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये असलेले फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकतात. बीटमध्ये नैसर्गिकरित्या ऑक्सलेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी बीट खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

दारू बरोबर खाणाऱ्या स्नॅक्सना ‘चकना’ का म्हणतात? केंव्हापासून पडली ही ‘दारू विथ चकना’ची पद्धत?

बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते?

शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. पण हा खूप मोठा गैरसमज आहे. बीटमध्ये लोह आढळून येते, पण इतर पदार्थांच्या तुलनेत अतिशय कमी लोह असते. लोहाची कमतरता किंवा अ‍ॅनिमिया झाल्यानंतर केवळ बीटवर नाहीतर डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या आणि विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. या पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीट कच्चे खावे की शिजवून?

    Ans: दोन्ही प्रकारे बीट खाता येते. कच्च्या बीटमध्ये काही उष्णतासंवेदनशील पोषक घटक अधिक टिकून राहतात, तर शिजवल्याने ते पचण्यास काही लोकांसाठी सोपे होऊ शकते.

  • Que: कोणत्या व्यक्तींनी बीटचे सेवन मर्यादित ठेवावे?

    Ans: ज्यांना किडनी स्टोनचा इतिहास आहे, विशेषतः कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन होण्याची प्रवृत्ती आहे, त्यांनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बीटचे सेवन मर्यादित ठेवावे. बीटमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण तुलनेने जास्त असते.

  • Que: बीटमुळे अपचन होऊ शकते का?

    Ans: काही व्यक्तींना जास्त प्रमाणात बीट खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस किंवा अपचनाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे सुरुवातीला कमी प्रमाणात सेवन करणे योग्य ठरते.

Web Title: Raw or cooked beetroot which is better these people should avoid eating beetroot to help reduce the risk of kidney stones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • Health Care Tips
  • Kidney stones

संबंधित बातम्या

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
1

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर
2

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे
3

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक
4

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.