Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेळीच ओळखा लिव्हर कॅन्सरची लक्षणे! लिव्हरच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

लिव्हरच्या गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य चांगले राहील आणि लिव्हरच्या आजारांपासून सुटका मिळेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 15, 2026 | 05:30 AM
वेळीच ओळखा लिव्हर कॅन्सरची लक्षणे! लिव्हरच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

वेळीच ओळखा लिव्हर कॅन्सरची लक्षणे! लिव्हरच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Follow Us
Follow Us:

लिव्हरच्या आजारांची कारणे?
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
लिव्हर मजबूत राहण्यासाठी काय खावे?

जीवनशैलीत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन, चुकीच्या वेळी जेवण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. लिव्हर शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. पित्त तयार करणे, शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे, रक्त शुद्ध करणे इत्यादी महत्वपूर्ण ५० पेक्षा जास्त कामे लिव्हर करते. हा आपल्या शरीरातील सगळ्यात मोठा आणि अतिशय महत्वाचा अवयव आहे. पण हल्लीची बदललेली जीवनशैली आणि आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम होतो. सुरुवातीच्या टप्प्यात शरीरात कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने समस्या वाढतात आणि लिव्हरचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.(फोटो सौजन्य – istock)

ॲलर्जी की इन्फेक्शन? शिंक, खोकला आणि नाक बंद होणं यात फरक कसा ओळखायचा, जाणून घ्या तज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

लिव्हरसबंधित आजार झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने समस्या आणखीनच तीव्र होतात आणि शरीराचे गंभीर नुकसान करतात. लिव्हर कॅन्सर किंवा फॅटी लिव्हर झाल्यानंतर दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरेल. आज आम्ही तुम्हाला लिव्हरच्या आजारांची लागण झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात? लिव्हरसबंधित आजार होऊ नये म्हणून कोणते पदार्थ खावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहण्यासोबतच शरीराला अजिबात हानी पोहचणार नाही.

लिव्हरच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • भूक न लागणे
  • झपाट्याने वजन कमी होणे
  • पोट फुगणे किंवा पोटात सूज येणे
  • वारंवार उलट्या, मळमळ
  • डोळे आणि त्वचा पिवळी पडणे

लिव्हरच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हेल्दी पदार्थ:

संपूर्ण शरीर कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पालेभाज्यांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, हंगामी ताजी फळे, संपूर्ण तृणधान्ये, डाळी, कडधान्ये खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. याशिवाय लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच आरोग्य सुधारते. अल्कोहोल, जंक फूड, प्रोसेस्ड अन्नपदार्थ, मैद्याचे आणि जास्त फॅट असलेले तळलेले तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराच्या अंतर्गत अवयवांना हानी पोहचते आणि आरोग्य बिघडते.

Health Update: मातेच्या गर्भातच थांबवला मृत्यूचा धोका! वाडियात आईला औषधे देत बाळाच्या हृदयातील गाठींवर उपचार

लिव्हर कॅन्सर किंवा लिव्हरच्या गंभीर आजारांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. याशिवाय आहारात साखर युक्त किंवा प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करू नये. हे पदार्थ लिव्हरसह शरीरातील अवयव आतून पोखरतात आणि आरोग्याला हानी पोहचवतात. दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणते पदार्थ असावेत?

    Ans: हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये, सुकामेवा, हळद, लसूण आणि अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

  • Que: लिव्हर कॅन्सरचा धोका कोणाला जास्त असतो?

    Ans: दीर्घकाळ फॅटी लिव्हर, सिरोसिस, हिपॅटायटिस बी किंवा सी संसर्ग, अतिमद्यपान, लठ्ठपणा आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये धोका वाढू शकतो.

  • Que: लिव्हर कॅन्सर पूर्णपणे टाळता येतो का?

    Ans: सर्व प्रकरणे टाळता येत नसली तरी निरोगी जीवनशैली, जोखीम घटकांवर नियंत्रण आणि वेळेवर तपासणी केल्यास धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Recognize the symptoms of liver cancer early include these foods in your diet to stay free from liver diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Fatty Liver
  • liver cancer
  • liver care

संबंधित बातम्या

फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, औषधांसोबतच शरीराला मिळेल पोषण
1

फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, औषधांसोबतच शरीराला मिळेल पोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.