
आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा 'या' पेयांचे सेवन
लिव्हरचे आरोग्य कशामुळे बिघडते?
लिव्हर स्वच्छ करण्यासाठी उपाय?
लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी नियमित करा पेयांचे सेवन?
Liver Detox Juices: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरातील विविध अवयवांना हानी पोहचते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक योग्य वेळी बाहेर पडून न गेल्यास सर्वच अवयवांच्या कार्यात अडथळे निर्माण होते. लिव्हर शरीराची पन्नासपेक्षा जास्त कामे करते. पण लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. लिव्हर स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या सप्लिमेंट्स, गोळ्या औषध आणि इतर उपाय केले जातात. पण चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. लिव्हर सोरायसिय, लिव्हर कॅन्सर किंवा लिव्हरसबंधित आजारांची लागण होऊ नये म्हणून आहारात नियमित या पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे लिव्हर मुळांपासून स्वच्छ होईल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
आहारात भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि प्रथिनांचा समावेश करावा. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आहारात कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नये. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, नियमित मद्यपान किंवा हिपॅटायटिसचा इतिहास असल्यास कोणत्याही गोळ्या औषधांचे अजिबात सेवन करू नये. लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी वेगवेगळे लिव्हर डिटॉक्स किंवा उपचार केले जातात, पण त्याऐवजी संतुलित आहार, भरपूर पाणी आणि दारू-तंबाखू टाळणे आणि अनावश्यक औषधांपासून दूर राहिल्यास लिव्हर स्वच्छ राहील.