शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी नियमित करा 'या' भाज्यांच्या रसाचे सेवन
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. शरीरावर अनावश्यक चरबीचा घेर वाढल्यानंतर तो कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. कधी आहारात बदल केला जातो तर कधी जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करून वयज कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. वजन वाढल्यानंतर शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या वाढू लागतात. वाढलेल्या वजनामुळे काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. कपडे खरेदी करताना मनात अनेक गोंधळ निर्माण होतात. बऱ्याचदा वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला महागडे डाएट फॉलो करतात. पण यामुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. शरीरावर चरबी जमा झाल्यानंतर काहीवेळा चरबीचा गाठी तयार होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
हातात दिसले ‘हे’ 5 बदल तर व्हा सावध! Liver Damage चे संकेत करू नका दुर्लक्ष
शरीरावर वाढलेले वजन योग्य पद्धतीने कमी करणे आवश्यक आहे. उपाशी राहून किंवा सकाळचा नाश्ता न करता वजन कमी करत असाल तर ही सवय आरोग्यासाठी धोक्याची ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळी उठून कोणत्या भाज्यांच्या रसाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाज्यांचे रा शरीरासाठी अतिशय प्रभावी आणि गुणकारी ठरतील. भाज्यांचा रस प्यायल्यामुळे शरीर आतून स्वच्छ होते आणि आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. याशिवाय चरबीचा थर कमी होतो.
सकाळी उठल्यानंतर नियमित दुधीचा रस प्यायल्यास महिनाभरात फरक दिसून येईल. याशिवाय बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. दुधीच्या रसात खूप कमी कॅलरीज आणि भरपूर पाणी असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते. रिकाम्या पोटी दुधाचा रस प्यायल्यास लवकर भूक लागत नाही. भूक नियंत्रणात राहते. दुधीचा रस प्यायल्यामुळे पोट स्वच्छ होते आणि जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते.
चवीला कडू असलेले कारलं खायला कोणाला आवडत नाही. कारल्याचे नाव घेतल्यानंतर अनेक लोक मुरडतात. पण कारल्याची भाजी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सकाळी उठून नियमित किंवा आठवड्यातून दोनदा कारल्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी कारल्याचा रस वरदान ठरतो. यामध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला केवळ पोषण न देता विषारी घटक बाहेर काढून टाकतात.
महिनाभर नियमित बीटच्या रसाचे सेवन केल्यास शरीरात जमा झालेली सर्व घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बीट आणि आवळा घालून बनवलेल्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीरावर वाढलेला चरबीचा थर कमी होईल आणि आरोग्य सुधारेल. बीटचा रस प्यायल्यामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल.
वजन कमी करण्यासाठी टिप्स:
वजन कमी करण्याच्या प्रवासासाठी साध्य करता येण्याजोगी ध्येये निश्चित करा.तुम्ही काय खात आहात याकडे लक्ष द्या आणि त्याप्रमाणे खाण्याची सवय लावा.
पोटाची चरबी का वाढते?
जास्त साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि अस्वास्थ्यकर चरबीयुक्त आहार घेतल्याने चरबी वाढते. दीर्घकाळ ताण घेतल्याने कोर्टिसोल नावाचे हार्मोन वाढते, ज्यामुळे पोटाभोवती चरबी जमा होते.