पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी करण्यासाठी उपाशी पोटी करा 'या' ड्रिंकचे सेवन
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. दैनंदिन जीवनात फॉलो केलेल्या चुकीच्या सवयींमुळे आणि खाण्याच्या सवयींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचते. अतितिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीराला हानी पोहचते. वजन कमी करण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन, डिटॉक्स ड्रिंक, महागडे डाएट इत्यादी अनेक गोष्टी फॉलो करतात. यामुळे पण तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. वजन कमी करताना महागड्या पेयांचे सेवन करण्याऐवजी स्वयंपाक घरातील पदार्थांचे सेवन करावे. स्वयंपाक घरात असलेले पदार्थ शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोणत्या ड्रिंकचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.हे ड्रिंक महिनाभर नियमित प्यायल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसतात.(फोटो सौजन्य – istock)
तळ हातांना कायमच घाम येतो? ही समस्या नॉर्मल की कोणत्या आजाराचे गंभीर लक्षण, जाणून घ्या घरगुती उपाय
हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, गरम तव्यावर ओवा, बडीशेप आणि मेथी दाणे हलकेसे भाजून घ्या. त्यानंतर भाजून घेतलेले सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. तयार करून घेतलेले मिश्रण बंद डब्याच्या झाकणात भरून ठेवा. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट तयार केलेली पावडर मिक्स करून घ्या.त्यानंतर नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. या पेयाच्या सेवनामुळे शरीराला कोणतीही हानी होत नाही. याउलट शरीराला अनेक फायदे होतात.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. पण कोणत्याही महागड्या पेयांचे सेवन करण्याऐवजी आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे. बडीशेप खाल्ल्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होते आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो. याशिवाय हळद आणि दालचिनी शरीरातील थर्मिक अॅक्टिव्हिटी वाढवतात, ज्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होऊन जातो. याशिवाय वारंवार तुम्हाला जर अपचन, गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत असेल तर बडीशेपेचे पाणी प्यावे.