जेवणानंतर नियमित करा 'या' हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर
रात्रीच्या जेवणानंतर प्रत्येकालाच बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही.अनेक लोक सतत बडीशेपचे सेवन करतात. दुपारी जेवल्यानंतर किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर बडीशेप खाली जाते. बडीशेप खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. स्वयंपाक घरातील मसाल्यांमध्ये बडीशेप सहज उपलब्ध होते. गोडसर चवीची बडीशेप गरम मसाला किंवा इतर स्वयंपाक घरातील मसाले बनवण्यासाठी वापरली जाते. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक, जीवनसत्त्व ए इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय विटामिन बी आणि ए मोठ्या प्रमाणात असतात. आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.(फोटो सौजन्य – istock)
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर शरीरात अनेक मोठे बदल होतात. वारंवार अपचन, ऍसिडिटी, गॅस, पोट फुगणे इत्यादी समस्या उद्भवल्यानंतर शरीराच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे लिव्हर आणि किडनीचे आरोग्य बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बडीशेपचे पाणी प्यायल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात? बडीशेपचे पाणी कसे तयार करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर वारंवार गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करावे.
बडीशेपचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चमचाभर बडीशेप टाकून पाण्याला ५ ते ६ मिनिटं उकळी काढून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले पाणी गाळून थंड करण्यासाठी ठेवा. सकाळी उपाशी पोटी बडीशेपचे पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचुन राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि आतड्यांची हालचाल सुलभ होण्यास मदत होईल.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बडीशेपचे पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. अशावेळी उपाशी पोटी बडीशेपचे पाणी प्यावे. यामुळे पोटात वाढलेला गॅस आणि अपचन कमी होते. शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी बडीशेपचे पाणी प्यावे. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स गुणधर्म शरीरातील पेशींचे रक्षण करते. मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवून देण्यासाठी बडीशेपचे पाणी प्यावे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी प्यावे.