१० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. सतत काम करत राहिल्यामुळे शरीरात थकवा वाढण्यासोबतच हातापायांमध्ये वेदना वाढू लागतात. पाय दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. पण असे न करता पायांची सुद्धा काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. पायांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. मात्र संपूर्ण शरीराचा भार पायांवर असल्यामुळे काहीवेळा पायांना सूज येणे, पायांमध्ये वेदना होणे, चालताना किंवा वर उठताना पायांमध्ये वेदना होऊ लागतात. याशिवाय चुकीच्या चपलांचा वापर केल्यामुळे सुद्धा पायांमध्ये वेदना होतात.(फोटो सौजन्य – istock)
10 पैकी 6 महिलांना होतेय Urine Leakage ची समस्या, लाजिरवाणे वाटत असेल तर करा 3 जबरदस्त उपाय
पायांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्यात १० मिनिटं पाय बुडवून ठेवावेत. हा अतिशय उत्तम आणि सोपा पर्याय आहे. गरम पाण्यात पाय बुडवून ठेवल्यामुळे पायांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होते. याशिवाय पायांच्या स्नायूंना आराम मिळतो. तसेच शरीरातील थकवा अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला गरम पाण्यात पाय बुडवून ठेवल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे सोपे उपाय शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतील.
गरम पाण्यात पाय बुडवून ठेवल्यामुळे पायांच्या वेदनांपासून आराम मिळतो. याशिवाय त्वचेमधील छिद्र ओपन होतात आणि पायांची त्वचा स्वच्छ होते. पायांवर चिटकून राहिलेली घाण आणि धूळ स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात पाय बुडवून ठेवावे. पायांची दुर्गंधी आणि मातीच्या संपर्कात आल्यामुळे त्वचेवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी गरम पाण्यात पाय बुडवून ठेवावे. गरम पाणी केल्यानंतर पाण्यात मीठ टाकावे. यामुळे पायांना आलेली सूज आणि कमी होऊन पायांच्या स्नायूंना आराम मिळतो. पाण्यात टाकण्यासाठी तुम्ही ईप्सम सॉल्ट किंवा साधे सैंधव मीठ सुद्धा वापरू शकता.
गरम पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे केवळ पायांच नाहीतर संपूर्ण शरीराला फायदा होतो. यामुळे मन सुद्धा प्रसन्न राहते. शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि मन कायमच आनंदी ठेवण्यासाठी गरम पाण्यात काहीवेळ पाय बुडवून ठेवावेत. बऱ्याचदा शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे झोपेची गुणवत्ता खराब होऊन जाते. अशावेळी रात्री झोपण्याआधी गरम पाण्यात काहीवेळ पाय बुडवून ठेवावेत. यामुळे थकवा कमी होऊन चांगली झोप येते. संपूर्ण शरीर रिक्लास करण्यासाठी गरम पाण्यात काहीवेळ पाय बुडवून ठेवावेत. पायांमध्ये वाढलेल्या वेदना किंवा इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाणी अतिशय प्रभावी ठरते.