Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reliance Foundation Hospital : एका दिवसात ६ रुग्णांना नवे जीवन; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचा अभिमानास्पद विक्रम

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने एका दिवसात दोन मरणोत्तर अवयवदान आणि सहा जीवनरक्षक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करत अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 28, 2026 | 02:13 PM
Reliance Foundation Hospital : एका दिवसात ६ रुग्णांना नवे जीवन; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचा अभिमानास्पद विक्रम

Reliance Foundation Hospital : एका दिवसात ६ रुग्णांना नवे जीवन; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचा अभिमानास्पद विक्रम

Follow Us
Follow Us:
  • एका दिवसात दोन मरणोत्तर अवयवदानाची यशस्वी अंमलबजावणी.
  • सहा जीवनरक्षक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण.
  • अवयव आणि ऊतींची विविध रुग्णालयांमध्ये समन्वयाने देवाणघेवाण.
रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने आपल्या अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमात आज एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. एका दिवसात दोन मरणोत्तर अवयवदानाची यशस्वी अंमलबजावणी करत रुग्णालयात सहा जीव वाचवणाऱ्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या. यासोबतच भारतातील आघाडीच्या अवयव प्रत्यारोपण केंद्रांसोबत अवयव आणि ऊतींची (टिश्यू) देवाणघेवाणही करण्यात आली.

पहिल्या अवयवदात्या या ३९ वर्षीय महिलेचा रस्ते अपघातात गंभीर मेंदूला दुखापत झाल्यानंतर ब्रेन डेड म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेत अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देण्याचा अमूल्य निर्णय घेतला.

Dizziness Causes: वारंवार चक्कर येतेय? दुर्लक्ष करू नका; असू शकतात ‘हे’ गंभीर आजार

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली अवयव प्रत्यारोपणे –

• अतितातडीच्या (Supra-Urgent) श्रेणीतील VV-ECMO सपोर्टवर असलेल्या ५९ वर्षीय पुरुष रुग्णावर दोन्ही फुफ्फुसांचे (बायलेटरल लंग्स) यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.
• ४६ वर्षीय महिला रुग्णावर यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण करण्यात आले.
• ५६ वर्षीय महिला रुग्णावर एका मूत्रपिंडाचे (किडनी) प्रत्यारोपण करण्यात आले.
इतर केंद्रांना देण्यात आलेले अवयव
• हृदय अहमदाबाद येथील यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी येथे पाठविण्यात आले.
• एक मूत्रपिंड मुंबईतील जसलोक हॉस्पिटलला देण्यात आले.
ऊती (टिश्यू) दान
• दोन्ही कॉर्नियांचे दान करण्यात आले असून, त्यामुळे दोन व्यक्तींना पुन्हा दृष्टी मिळण्यास मदत झाली.
दुसऱ्या अवयवदात्या या ५९ वर्षीय महिलेचा डाव्या मेंदूमध्ये झालेल्या इंट्रापॅरेन्कायमल रक्तस्रावानंतर (Left Intraparenchymal Haemorrhage) ब्रेन डेड म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबीयांनीही अवयवदानाचा निर्णय घेत अनेकांना नवजीवन दिले.
रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली अवयव प्रत्यारोपणे
• ४४ वर्षीय महिला रुग्णावर यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण करण्यात आले.
• ६० वर्षीय पुरुष रुग्णावर एका मूत्रपिंडाचे (किडनी) प्रत्यारोपण करण्यात आले.
इतर केंद्रांना देण्यात आलेले अवयव
• एक मूत्रपिंड नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलला देण्यात आले.
ऊती (टिश्यू) दान
• मुंबईतील ईबीसीआरसी आय बँकेमार्फत दोन्ही कॉर्नियांचे दान करण्यात आले. त्यामुळे आणखी दोन व्यक्तींना दृष्टी मिळण्यास मदत झाली.

एकूण पाच रुग्णांवर रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये सहा अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. यामध्ये दोन्ही फुफ्फुसे, दोन यकृत आणि दोन मूत्रपिंडांचा समावेश होता. तसेच इतर अवयव आणि ऊती देशातील विविध रुग्णालयांतील रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. या समन्वयातून भारतातील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण व्यवस्थेतील सहकार्याची भावना अधिक बळकट झाल्याचे अधोरेखित झाले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बोलताना, रिलायन्स फाउंडेशन हेल्थकेअर इनिशिएटिव्ह्जचे ग्रुप सीईओ आणि सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचे सीईओ डॉ. तरंग गियानचंदानी म्हणाले, “अत्यंत दुःखाच्या प्रसंगातही दोन कुटुंबांनी इतरांना जीवनदान देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या धैर्याने आणि उदारतेने अनेक रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण केला आहे. एका दिवसात दोन मरणोत्तर अवयवदानाची यशस्वी अंमलबजावणी आणि आमच्या रुग्णालयात सहा जीवनरक्षक अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करणे हा अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानास्पद टप्पा आहे. ही कामगिरी केवळ अवयवदात्या कुटुंबांच्या निःस्वार्थ निर्णयामुळेच नव्हे, तर आमच्या आरोग्यसेवा व्यवस्थेतील उत्कृष्ट समन्वय, वैद्यकीय कौशल्य आणि टीमवर्कमुळे शक्य झाली आहे”.

३० तासांचे अथक परिश्रम

डॉ. तरंग गियानचंदानी म्हणाले की, ” आमच्या बहुविद्याशाखीय प्रत्यारोपण पथकाने सलग सुमारे ३० तास अथक परिश्रम घेत प्रत्येक अवयव सुरक्षितपणे काढणे, वाहतूक करणे आणि प्रत्यारोपण करणे यशस्वीरीत्या पूर्ण केले. डॉ. गौरव गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील लिव्हर ट्रान्सप्लांट टीम, लंग ट्रान्सप्लांट टीम, डॉ. राहुल पंडित यांच्या नेतृत्वाखालील इंटेन्सिव्हिस्ट टीम, डॉ. ए. एन. सिंह यांच्या नेतृत्वाखालील लिव्हर ट्रान्सप्लांट आयसीयू टीम, ट्रान्सप्लांट सर्जन्स, भूलतज्ज्ञ, नर्सिंग स्टाफ, ट्रान्सप्लांट समन्वयक, परफ्युजनिस्ट, ऑपरेशन थिएटर, प्रयोगशाळा, ब्लड बँक आणि सहाय्यक सेवा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. अवयव संकलन आणि वाटप प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तसेच ग्रीन कॉरिडॉर तयार करून अवयव वेळेत पोहोचविण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती आणि मुंबई पोलिसांचेही आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आम्ही अवयवदात्या कुटुंबांचे सदैव ऋणी आहोत. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या प्रिय व्यक्तींचे अस्तित्व अनेकांच्या आयुष्यात कायम राहील आणि अधिकाधिक लोकांना अवयवदानासाठी प्रेरणा मिळेल.”

Budget Travel : अंदमान-मनालीची मजा आता फक्त अर्ध्या खर्चात… हे 5 सिक्रेट स्पॉट आहेत फिरण्यासाठी परफेक्ट

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातील प्रगती, अवयवदानाबाबत जनजागृती आणि जागतिक दर्जाच्या प्रत्यारोपण सेवा उत्कृष्ट वैद्यकीय कौशल्य, बहुविद्याशाखीय समन्वय तसेच रुग्णकेंद्री दृष्टिकोनातून उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

Web Title: Reliance foundation hospital performs six life saving organ transplants in one day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Reliance

संबंधित बातम्या

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा
1

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा
2

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध
3

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत
4

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.