वारंवार गरम केलेला चहा शरीरासाठी ठरेल विषासमान! खराब झालेला चहा कसा ओळखावा?
जगभरात असंख्य चहाप्रेमी आहेत. सगळ्यांच्या दिवसांची सुरुवात चहा आणि कॉफी पिऊन होते. चहा, कॉफी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, माचा इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारची पेय प्यायली जातात. चहा प्यायल्यानंतर झोप उडते, असे अनेकांना कायमच वाटते. सकाळी उठल्यानंतर एक कप चहाचे सेवन केल्यास मन शांत होते आणि शारीरिक मानसिक तणावापासून सुटका मिळते. पण अनेकांना सतत चहा पिण्याची सवय असते. चहा थंड झाल्यानंतर तो पुन्हा पुन्हा गरम करून प्यायला जातो. पण एकच चहा वारंवार गरम करून प्यायल्यास शरीराचे नुकसान होते. दिवसभरात चार ते पाच वेळा चहाचे सेवन केल्यास अपचन, ऍसिडिटी किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. एकदा बनवलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून प्यायला जातो. यामुळे आरोग्याला हानी पोहचू शकते.(फोटो सौजन्य – istock)
घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं दुधाचा चहा पिण्याची सवय असते. पण दूध घालून बनवलेला चहा २ ते ३ तासांमध्ये खराब होऊन जातो. चहामध्ये शरीरासाठी घातक असलेले गंभीर विष तयार होते. याशिवाय घरातील तापमानामुळे चहामध्ये हानिकारक बॅक्टरीया तयार होतात. चहामधील पौष्टिक घटक नष्ट झाल्यामुळे चहाची चव पूर्णपणे खराब होऊन जाते. वारंवार गरम केलेल्या चहामध्ये टॅनिन आम्लयुक्त घटक तयार होतात, ज्यामुळे आम्लता, गॅस आणि पचनाच्या समस्या उद्भवतात. सकाळी बनवून ठेवलेला दुधाचा चहा फ्रिजमध्ये ठेवल्यास तो ४ ते ५ तासांपर्यंत व्यवस्थित टिकून राहतो. पण दुधाचा चहा जास्त वेळ साठवून ठेवल्यास चव आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म कमी होऊन जातात.
वारंवार गरम केलेला चहा प्यायल्यास शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम दिसून येतात. याशिवाय अन्ननलिकेमध्ये पित्त तयार होते, ज्यामुळे ऍसिडिटी, अपचन, आंबट ढेकर, उलट्या, मळमळ इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे सतत गरम केलेला चहा पिऊ नये. अतिप्रमाणात चहाचे सेवन केल्यामुळे शरीरातील पोषणाचे नुकसान होते, ज्यामुळे अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक जीवनसत्वे नष्ट होऊन जातात. गरम चहाच्या सेवनामुळे आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहचते, तर काहीवेळा आतड्यांच्या चिंध्या होतात.