पित्तवाहिन्यांच्या कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराला कोणत्याही क्षणी गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जगभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर पायाखालची जमीन सरकून जाते. कॅन्सर झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष देऊन वेळीच निदान केल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो.शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. या आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. कॅन्सरचे योग्य वेळी निदान न झाल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो. असाच एक कॅन्सर म्हणजे पित्ताशय आणि पित्तवाहिन्यांचा कॅन्सर. हा कॅन्सरचा प्रकार अतिशय दुर्मिळ आहे. त्यामुळे पित्ताशयाच्या कॅन्सरचे योग्य वेळी निदान होणे आवश्यक आहे. अन्यथा उचाराअभावी रुग्णांनाच मृत्यू होऊ शकतो.(फोटो सौजन्य – istock)
आतून खिळखिळी झाली हाडं, मिळतील 3 संकेत; सांगडा होण्यापूर्वी 4 कामं
पित्ताशयाच्या कॅन्सरची लागण प्रामुख्याने महिलांना होण्याची शक्यता असते. त्यामुळे तसेच उत्तर भारतामध्ये पित्ताशयाच्या कॅन्सरचे भरपूर रुग्ण आढळून आले आहेत. हा कॅन्सर प्रामुख्याने तरुण वयोगातील मुलांमध्ये दिसून येतो. यामागे आनुवंशिक व पर्यावरणीय कारणे सुद्धा असू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पित्ताशयाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
कावीळ झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. सुरुवातीला त्वचा आणि डोळे पिवळे पडू लागतात. याशिवाय नख सुद्धा पिवळी दिसू लागतात. ट्यूमरमुळे बाइल डक्ट ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे रक्तात बिलिरुबिन वाढते आणि शरीरावरील त्वचा पिवळी दिसते.
पित्ताशयाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतात. या वेदना काहीवेळा पोटातील वेदना अतिशय सामान्य असतात तर काहीवेळा वेदना खूप जास्त तीव्र होतात. याशिवाय पोटात गॅस, ऍसिडिटी किंवा अपचनाच्या समस्या वाढतात. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणारे प्रमुख लक्षण म्हणजे भूक कमी होणे. भूक कमी झाल्यानंतर कोणताही पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची अजिबात इच्छा होते. पोट कायमच भरल्यासारखे वाटते. याशिवाय वजन झपाट्याने कमी होऊन जाते. कॅन्सर पेशी शरीराची मेटाबॉलिझम प्रोसेस पूर्णपणे बदलून टाकतात. याशिवाय वारंवार उलट्या आणि मळमळ वाटू लागते.
पित्ताशयाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे:
त्वचा आणि डोळे पिवळे दिसणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे. पित्त नलिका अवरोधित झाल्यामुळे हे घडते.भूक कमी होणे किंवा अजिबात भूक न लागणे.कावीळ झाल्यामुळे मल फिकट आणि लघवी गडद रंगाची होऊ शकते.
पित्त नलीचा कर्करोग आणि पित्ताशयाचा कर्करोग यांत काय फरक आहे?
पित्त नलीचा कर्करोगपित्त नलिकांमध्ये होतो, तर पित्ताशयाचा कर्करोग पित्ताशयात होतो. दोन्हीमध्ये सारखीच लक्षणे दिसू शकतात.
सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसतात का?
नाही, सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत किंवा ती खूप सौम्य असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.